Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

मोहन बने यांच्या ऑलिम्पिकवरील पुस्तकाचे आज प्रकाशन
मुंबई, ९ मार्च / क्री. प्र.

वृत्तछायाचित्रकार मोहन बने यांनी लिहिलेल्या ‘ऑलिम्पिकचे सोनेरी सीमोल्लंघन’ या पुस्तकाचा

 

प्रकाशन सोहळा उद्या सोमवार, ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा माळा, बाळ शास्त्री, जांभेकर मार्ग (महापालिकेसमोर), छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई-१ येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले या दिग्गजांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी केसरी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा केसरीभाऊ पाटील हे अध्यक्ष म्हणून तर कालनिर्णयचे जयेंद्र साळगावकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मोहन बने यांच्या बीजिंग ऑलिम्पिकच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या वेळी पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना ऑलिम्पिकची अनुभूती देईल. याच समारंभात दोन ऑलिम्पिक स्पर्धा कव्हर करणाऱ्या ‘लोकसत्ता’चे विनायक दळवी, आय. बी. एन. लोकमतचे संदीप चव्हाण आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रल्हाद सावंत या मराठी पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचे छायाचित्रण करताना आपला जीव धोक्यात घालणाऱ्या श्रीराम वेर्णेकर, वसंत प्रभू, संतोष बने, सॅबी फर्नाडिस या वृत्तछायाचित्रकारांचाही खास सत्कार करण्यात येणार आहे.