Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
व्यापार-उद्योग

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.च्या वतीने देण्यात येणारा प्रशिक्षणात प्राविण्याचा पुरस्कार प्रोग्रेसिव्ह टेक्निकल एज्युकेशन प्रा. लि.ला देण्यात आला. कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापक विणा कामत यांच्या हस्ते हा पुरस्कार नितीन अग्रवाल यांनी स्वीकारला. सोबत सु. ना. जोशी व वैभव जोशी.

‘फिलिप्स’ कंपनीविरोधात मक्तेदारी प्रतिबंधक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
व्यापार प्रतिनिधी : फिलिप्स रेडिओची दि. १० एप्रिल २००२ रोजी प्रकाशित जाहिरात वाचून मुंबईचे एक ग्राहक प्रशांत साने यांनी सदर रेडिओ हजार रुपयाला विकत घेतला. या जाहिरातीमध्ये सदर रेडिओचे ‘जगातील पहिला बॅटरी व विजेशिवाय चालणारा एकमेव रेडिओ’ तसेच ‘एक मिनीट हॅन्डल फिरवा, तीस मिनिटे ऐकण्याचा आनंद घ्या’ व ‘दरमहा १०० रु. वाचवा’ असे आकर्षक पद्धतीचे वर्णन करण्यात आले होते.

टाटा मोटर्सची आकर्षक फिक्स डिपॉझिट योजना
व्यापार प्रतिनिधी : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी आणि टाटा ग्रुप्सच्या शिरपेचातील एक महत्त्वाचे रत्न असलेल्या टाटा मोटर्स या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी फिक्स डिपॉझिट योजना आणून बाजारात प्रवेश केला आहे. टाटा समूह आणि टाटा मोटर्स यांचे आपल्या कर्जदारांना परतावा देण्याबाबत मजबूत ट्रॅक ठेवला आहे. टाटा समूह हा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संचलनाबरोबर भारतातील जलदगतीने विकसित होणारा व्यावसायिक समूह आहे.

टोयोटातर्फे सर्वप्रथम सीएनजी एमपीव्हीची भारतात सुरुवात
व्यापार प्रतिनिधी : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) यांनी आज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) इंधनप्रकारात आपली इनोव्हा गाडी उपलब्ध केल्याची घोषणा केलेली आहे. इंधनबचतीची क्षमत असलेल्या मल्टिपर्पज व्हेहिकलमध्ये हे देशातील सर्वप्रथम वाहन आहे. इनोव्हाच्या सर्वच पेट्रोल ग्रेड्समध्ये सीएनजी प्रकार उपलब्ध असेल.

शेवर्ले स्पार्कचे जगात तीन दशलक्ष ग्राहक
व्यापार प्रतिनिधी : जनरल मोटर्स इंडिया यांनी जाहीर केले की, संपूर्ण जगात पसरलेल्या विविध प्रकारच्या कारप्रेमींमधील वाढत्या लोकप्रियतेची पुष्ठी करीत शेवर्ले स्पार्कने जगभरातील तीन दशलक्ष निष्ठावंत ग्राहकांची नोंद घेतली आहे. जीएम इंडियाच्या सर्वाधिक खपाचे मॉडेल असणाऱ्या शेवर्ले स्पार्कने आपल्या सवरेत्कृष्ट गुणवत्तेच्या वैशिष्टय़ांसाठी आणि आपल्या दर्जामध्ये सर्वात जास्त इंधन बचत करण्यासाठी २००७ आणि २००८ ही सलग दोन वर्षे प्रतिष्ठेचे असणारे जे. डी. पॉवर इनिशिएल क्वॉलिटी स्टडी (आयक्यूएस) अ‍ॅवार्डदेखीलजिंकले आहे.

महिंद्रा ऑटोच्या वाहनविक्रीत २१.६ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वाहनउद्योग विभागाचे मुख्य प्रचालन अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विक्रीत २१.६ टक्के वाढ झाल्याची घोषणा केली आहे. तसेच जानेवारी २००९ मध्ये बाजारात आणलेल्या झायलो मोटारीची विक्री उत्तम असल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने २२८७ झायलो मोटारींची विक्री साध्य केली आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा वाहन विभागाने फेब्रुवारी २००९ मध्ये एकूण १९५९४ वाहनांची विक्री केली आहे. गतसाली याच महिन्यात कंपनीने एकूण १८३७९ वाहनांची विक्री केली होती. स्थानिक बाजारपेठ व निर्यात बाजारपेठ यांची बेरीज केल्यास कंपनीने एकूण १९८९४ वाहनांची विक्री केली आहे. गतसाली याच महिन्यात हा आकडा १९६७४ वाहने असा होता. वर्तमान वित्तीय वर्षांत फेब्रुवारी २००९ पर्यंत महिंद्रा ऑटो कंपनीने एकूण १९४४६७ वाहनांची विक्री केली आहे. गतसाली कंपनीने याच कालावधीत एकूण १९५८४९ वाहनांची विक्री केली होती. फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनीने एकूण ३०० वाहने निर्यात केली आहेत. गतसाली याच महिन्यात कंपनीने १२९५ वाहने निर्यात केली होती.

सॅमसंगची नवीन गुरू श्रेणी
व्यापार प्रतिनिधी : सॅमसंग मोबाईलने आपली लोकप्रिय गुरू श्रेणी आता अधिक वृद्धिंगत केली आहे. गुरू श्रेणीमध्ये ६ नवीन व अनेकविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण हॅन्डसेट समाविष्ट करून ते भारतीय बाजारांमध्ये दाखल केले आहेत. हे ६ नवीन गुरू हॅन्डसेट आहेत- गुरू १०७०, गुरू ११००, गुरू ११२५, गुरू १२१०, गुरू १३१० व गुरू १४१०. सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या टेलिकॉम बिझनेस विभागाच्या संपूर्ण देशभरातील कारभाराचे प्रमुख सुनील दत्त यांनी सांगितले की, प्रारंभिक स्तराच्या मोबाईल फोन विभागात आमच्या गुरू श्रेणीमुळे ग्राहकांनी मोबाईलसाठी केलेला खर्च पुरेपूर वसूल होतो. २००८ सालात गुरू श्रेणीला मिळालेले यश लक्षात घेऊनच आम्ही या वर्षी या श्रेणीत सहा नवीन गुरू मॉडेल्स दाखल केली आहेत. नवीन गुरू श्रेणीमध्ये स्टीरीओ एफएम, टॉर्च लाइट, मोबाईल प्लेअर, अ‍ॅडव्हान्स मोबाईल ट्रॅकर अशा अनेक वैशिष्टय़ांचा समावेश करण्यात आला आहे. गुरू १४१० मध्ये ब्ल्यूटूथ व डय़ुएल लाऊडस्पीकर्स ही वैशिष्टय़ेदेखील उपलब्ध आहेत.

पारले अ‍ॅग्रोने आणले लिंबू शीतपेय
व्यापार प्रतिनिधी : भारतातील शीतपेयांमधील आघाडीची कंपनी पारले अ‍ॅग्रोने नवीन लिंबूपेय ‘एलएमएन’ (छटठ) बाजारात दाखल केले आहे. नॉन-काबरेनेटेड विभागातील हे पेय ‘एलएमएन’ हे नैसर्गिक लिंबूरस पेय असून घरी बनविण्यात आलेल्या लिंबू सरबतासारखी म्हणजेच ज्याला आपण निंबूपाणी म्हणतो तशी चव देणारा तो भारतातील एकमेव ब्रँड आहे. यात कोणत्याही प्रकारे कृत्रिम फ्लेव्हर नाही आणि त्यात अस्सल लिंबूरस असल्याने ‘एलएमएन’ ग्राहकांना आरोग्यदायक, तजेलदार पेय व्हिटॅमीन ‘सी’सह उपलब्ध होते. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये भारतीय शीतपेयांच्या बाजारपेठेत कोला कंपन्यांमधील युद्धाचा भडिमार होतो. या उन्हाळ्यात मात्र ‘एलएमएन’ दाखल झाल्याने कोला युद्ध मागे पडणार असून आता खरे युद्ध अनुभवाला येणार आहे ते कोलाव्यतिरिक्त इतर पेयांच्या माध्यमातून. अगदी स्पष्टच सांगायचे तर निंबूपाणी विभागात ही स्पर्धा स्पष्ट जाणवणार आहे.

गुणवत्ता- उत्पादकतेसाठी सिक्स सिग्मा प्रणाली
व्यापार प्रतिनिधी : जागतिकीकरणाच्या बाजारपेठेत यशस्वीपणे टिकण्यासाठी भांडवलाबरोबरच ज्ञान व माहिती आय. टी. हेही आवश्यक ठरले आहे. बडे उद्योग यांचा लाभ घेताना दिसतात. पण लघुउद्योग व मध्यम उद्योगांना आर्थिक कारणामुळे या क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. ही गरज ओळखून या क्षेत्रातील एक तज्ज्ञ लक्ष्मीकांत कठारे हे आपल्या ‘इम्प्रोसिस’ कंपनीद्वारे या सेवा पुरवीत आहेत. ई-कॉमर्सद्वारे मार्केटिंगचा खर्च कमी करून बाजारपेठेचा शोध घेणे, सिक्स सिग्मा प्रणालीमुळे व्यवस्थापनातील दोष दूर करणे, सॅपद्वारे इ. आर. पी. प्रणालीने कॉस्टिंग कंट्रोल राखणे अशा आदींचे प्रशिक्षण इम्प्रोसिसद्वारे इंटरनेटवरही दिले जाते. उत्पादकता व गुणवत्ता ही काळाची गरज आहे. त्यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा हे लक्ष्य हवे. संपर्क- ९४२१३७५३६५/ www.improsys.in