Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
विशेष

एका महिन्यात साडेसहा लाख बेकार!
अमेरिकेला मंदीचा जो जबर तडाखा बसला आहे त्यातून त्या देशात सावरण्यास बराच कालावधी लागणार आहे. मंदीचे परिणाम अजूनही अमेरिकी अर्थव्यवस्थेला जाणवत असून, सरकारने अब्जावधी डॉलरची मदत देऊ करूनही अर्थव्यवस्था मूळ पदावर येण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत. दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेची जी अवस्था झाली होती, तशी अवस्था या ‘इकॉनॉमिक पर्ल हार्बर’ने अमेरिकेची केली आहे, असे मत जगप्रसिद्ध अब्जाधीश वॉरन बफे यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला या संकटातून सावरण्यासाठी किमान पाच वर्षे तरी लागतील, असा बफे यांचा अंदाज आहे.

साहित्य आणि चित्रपट
साहित्य अकादमी आणि प्रतिमा फिल्म सोसायटी डोंबिवली यांनी अलीकडेच ‘साहित्य आणि चित्रपट’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांनी या वेळी यासंबंधी एक सविस्तर विवेचनच सादर केले. हे संपूर्ण विवेचन मननीय असले तरी शेवट करताना त्यांनी थोडक्यात लिहिलेली तुलनात्मक निरीक्षणे फार महत्त्वाची होती.
‘चित्रपट आणि साहित्य’ यांची तुलना करताना या अभ्यासाला एक मनोविश्लेषणात्मक अंग असते. लेखक एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याने निर्माण केलेल्या व्यक्तींकडे, प्रसंगांकडे पाहतो. त्याच्या लेखनातून त्याचे व्यक्तिमत्त्वही स्पष्ट होत जाते.

राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता; बंडाच्या हालचाली
काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यादरम्यान संभाव्य आघाडीची रूंदावत चाललेली दरी आणि सेना-भाजपाच्या मिलनावर झालेले शिक्कामोर्तब यामुळे दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पक्षश्रेष्ठींनी अनेक मातब्बरांच्या पाठीवर माती टाकून त्यांच्या महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचवल्याने अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या पट्टय़ात बंडाची निशाणे फडकवण्याच्या हालचाली पडद्याआड गतिमान झाल्या आहेत. यामुळे सातारा वगळता कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील तीनही मतदारसंघात लक्षवेधी लढतीचे संकेत मिळाले असून बंडखोरीचे निशाण कोण पकडतो यावर सेना-भाजप नजर ठेवून आहे. दक्षिण महाराष्ट्रात १४ व्या लोकसभेत राष्ट्रवादीकडे ४ तर काँग्रेसकडे सांगलीची एकमेव जागा होती. मतदार संघाच्या पूनर्रचनेत कराड लोकसभा मतदारसंघ वगळला गेल्याने आता राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राहिली तर दोन्ही पक्ष आपापल्या जागा राखतील, असे गेल्या काही महिन्यांपर्यंतचे वातावरण होते.