Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्त्री कुटुंबाच्या व पर्यायाने देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरेल’
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी

 

शिक्षणाशिवाय स्त्री काहीही करू शकत नाही. तिला स्वातंत्र्य द्या. तसेच कुटुंब व सहकाऱ्यांचे समर्थन आणि आशीर्वाद मिळाल्यास स्त्री कुटुंबाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरेल. राज्याच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या कुटुंबातील हुशार मुलींच्या विकासासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे लीला पूनावाला यांनी जागतिक दिनानिमित्त लायन्स क्लबतर्फे आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात सांगितले. या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्या पुष्पा हेगडे आणि सुमित्रा भावे यांनी स्त्रीचे कर्तृत्व, महत्त्व याचे वर्णन करून आपले अनुभव व्यक्त केले.
शहरातील ज्या महिलांनी जीवनात यशस्वीपणे संघर्ष करून स्वत:चा, तसेच कुटुंबाचा आणि समाजाचा विकास केला अशा स्त्रियांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘स्वयंसिद्धा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार विजेत्या स्त्रियांमध्ये प्रतिभा कोरपे, प्रतिभा पायगुडे, सुमंगला गोखले, गोदावरी भावले,मंगला फडणीस, जयश्री रवी, राजकुँवर सोनावणे, सुषमा देशपांडे, विमल वाणी, कमल बादशहा, छाया जाधव यांचा समावेश होता.
या महिलांनी स्वत:ला सावित्रीच्या लेकी समजून त्यांचा वारसा असाच पुढे नेऊ, असे उद्गार या क्षणी काढले. या वेळी ‘अपेक्षा’ या महिला विशेषांकाचे प्रकाशन लेखिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते झाले.