Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कारखान्याबरोबरच ‘सुरक्षित समाज’ टाटा मोटर्सचे अंतिम ध्येय - आंबर्डेकर
पिंपरी, ११ मार्च/ प्रतिनिधी

 

सुरक्षिततेची संकल्पना अधिक व्यापक बनविण्याची आवश्यकता असून सुरक्षिततेची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कारखान्यात ‘शून्य अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच सुरक्षित समाज हे अंतिम ध्येय साध्य करून कामगारांनी टाटा मोटर्स कंपनी ‘आदर्श कंपनी’ ठरावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन टाटा मोटर्स कंपनीच्या पुणे प्रकल्पाचे (सीव्हीबीयू) प्रमुख श्रीकृष्ण आंबर्डेकर यांनी आज केले.
राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त टाटा मोटर्स कंपनीने कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कंपनीच्या उत्पादन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आर. भास्कर, ऑटो प्रॉडक्शन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक व्ही. कृष्णमूर्ती, मनुष्यबळ विकास विभागाचे महाव्यवस्थापक प्रशांत अहीर, उपमहाव्यवस्थापक ए. के. घोष, सुरक्षितता विभागाचे विभागीय व्यवस्थापक अभयकुमार शहा, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष शिवाजी शेडगे, सरचिटणीस सुरेश फाले, सुरक्षितता समितीचे अध्यक्ष बाबासाहेब लोखंडे उपस्थित होते.
श्री. आंबर्डेकर म्हणाले, की सुरक्षिततेशी आपली बांधिलकी असली पाहिजे. त्यासाठी जागरूकता निर्माण करावी लागणे, चर्चा करावी लागण्याची आवश्यकताच उरता कामा नये. सुरक्षिततेची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविली जाणे आवश्यक आहे. केवळ स्वतपुरता, स्वतच्या कारखान्यापुरता अथवा घरापुरता विचार न करता सुरक्षिततेचा विचार व्यापक बनविणे गरजेचे आहे. समाजात सुरक्षिततेची चळवळ रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. त्याच भावनेतून टाटा मोटर्स कंपनीने राष्ट्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) सहकार्याने वाहनचालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वानी मनावर घेतले पाहिजे व समाजालाही बरोबर घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजे.
प्रशांत अहीर यांनी स्वागत केले. बाबासाहेब लोखंडे यांनी उपस्थितांना सुरक्षिततेची शपथ दिली. अभयकुमार शहा यांनी वर्षभरातील सुरक्षिता विषयक उपक्रमांचा आढावा सादर केला. सुरेश फाले यांनी सुरक्षितता संदेश दिला. डॉ. ए. बी. देवधर यांनी आभार मानले.
मावळ फौंड्री व ऑटो सव्‍‌र्हिसेस विभाग प्रथम
सवरेत्कृष्ट सुरक्षितता कामगिरीचे सेवा विभागातील प्रथम पारितोषिक ऑटो सव्‍‌र्हिसेस विभागाने तर द्वितीय क्रमांक एमपीएल अँड पर्चेस विभागाने मिळविला. उत्पादनात विभागात प्रथम क्रमांक मावळ फौंड्रीने तर द्वितीय क्रमांक ई ब्लॉक फॅक्टरीने पटकाविला. सेफ्टी स्टुअर्ड साठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत गियर फॅक्टरीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर पीई विभागाने द्वितीय क्रमांक मिळविला. बे ओनर्ससाठी प्रश्नमंजूषा स्पर्धेत गियर फॅक्टरीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर एचआर विभागाने द्वितीय क्रमांक मिळविला.
सुरक्षिता सप्ताहानिमित्त कामगारांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. कविता स्पर्धा - संतोष गवारी, अविनाश हळबे, महेश घाडीगावकर. निबंध स्पर्धा - मनोज आणेकर, दत्तात्रय घोलप, अविनाश हळबे. भित्तिपत्रक स्पर्धा - प्रसन्न ओगले, श्रीराम कुवर व सदानंद टेपुगडे. कामगार कुटुंबीयांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. कविता स्पर्धा - पूजा शेवाळे, सानिका धर्माधिकारी, शाहीन शेख. निबंध स्पर्धा - मोहिनी आणेकर, सुषमा गोवर्धन, छाया कुंभार. भित्तिपत्रक स्पर्धा - अर्चना टेपुगडे, पायल चौगुले व विजया सावंत.