Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘एमफोर्ज’ प्रकरणी आज मुंबईत बैठक
पिंपरी,११मार्च / प्रतिनिधी

 

‘एमफोर्ज’ कामगार प्रकरणी उद्या(गुरुवारी)मुंबई येथे कामगार आयुक्तालयात बैठक होणार आहे. ताडदेव येथील कामगार आयुक्तालयात दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे.त्यास कामगार आयुक्त अरुण कुमार ,कामगार नेते अर्जुन चव्हाण,प्रकाश ढवळे,अ‍ॅड.अनिल डुमने तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.ही कंपनी बंद करण्यासाठी व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे.२५४ कायम कामगार असलेल्या या कंपनीतील उत्पादन डिसेंबरपासून ठप्प आहे.सरकारने बंदची परवानगी देऊ नये, या मागणीसाठी कामगारांनी चाळीस दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. गेल्या महिन्यात मुंबई येथे राज्य कामगार सचिव कविता गुप्ता यांच्या दालनात बैठक घेतली होती.सरकार या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाला आवश्यक ती सर्व मदत करेल ;परंतु उत्पादन सुरु ठेवावे ,असे आदेश त्यांनी दिले होते.पुढील बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्याचे आश्वासनही त्यानी दिले होते.त्यानुसार ही बैठक होत आहे.कामगार आयुक्तालयाकडे हे प्रकरण वर्ग झाल्याने त्यांच्याकडे ही बैठक होईल.
कंपनी बंद करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज फेटाळून लावावा,अशी कामगारांची आग्रही मागणी कायम आहे,असे ढवळे यांनी सांगितले.