Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
  जीवनदायी आणि जीवन घडविणारे करिअर वैद्यकीय शिक्षण
  व्हिज्युअल रिझ्युमे
  रेल्वे अ‍ॅप्रेंटिस परीक्षेची एक चांगली संधी..
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  पीएसआय मुख्य परीक्षा : बुद्धिमापन चाचणी विषयाची तयारी
  संशोधनातील आधारसाहित्याचे स्वरूप व भूमिका
  ऑटोमोबाईल इंजिनीयरिंग
  ग्रंथालयाचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण
  डिफरन्ट एमबीए फार्मास्युटिकल एमबीए

 

वैद्यक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी १२वी सायन्सच्या परीक्षेत केवळ उत्तम गुण मिळवून भागणार नसून रुग्णांच्या सेवेची आवड, धडधाकट शरीरप्रकृती, चांगली बुद्धिमत्ता, जबाबदारीची जाणीव, उत्तम स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, सारासारविवेक, निर्णयक्षमता, धीर धरण्याची क्षमता, स्वनियंत्रण आणि सतत आनंदी राहण्याचे कसब या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
दहावीनंतरच जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि इतर कोर्सेस अशी विभागणी होत असते. ज्यांनी इतर कोर्सेस घेतलेले असतात त्यांनी आतापर्यंत व्यवसायाला सुरुवात केलेली असते, त्यांच्यापुढे १२वीनंतर पुढे काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो. वास्तविक पाहता १०वीच्या निकालानंतरच बुद्धिगुणांक आणि इतर कसोटय़ा वापरून पालकांनी आपल्या पाल्याने काय करावे किंवा विद्यार्थ्यांने आपण काय करावयाचे हे ठरविलेले असते आणि त्यानुसारच योग्य तो अभ्यासक्रम निवडलेला असतो. तरीही १२वीनंतर काय करता येऊ शकेल अशी उत्सुकता आजच्या विद्यार्थ्यांच्यात असल्याने त्यांना मार्गदर्शन व्हावे आणि दहावीनंतर काय करावयाचे हे ठरविलेले अन्य काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि त्यातही आपण नावलौकिक, मानमरातब, यश आणि संपत्ती मिळवू शकतो.
१२वीला एकूण तीन शाखा असतात. म्हणून प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय या तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांना काही कॉमन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भारतातल्या कोणत्याही अभ्यासक्रमासंदर्भात
 

व शैक्षणिक संस्थेबाबती educationinfoindia.com या संकेतस्थळावर माहिती मिळू शकते.
१. वैद्यकीय व्यवसाय : आजारी माणसाला आजारातून बरे करण्याच्या कौशल्यामुळे डॉक्टरी व्यवसायाला एक प्रकारे पावित्र्य प्राप्त झाले आहे. तर कुठल्याही व्यवसायापेक्षा या व्यवसायाला संपूर्ण जगभर खूप मानमरातब आणि आदर प्राप्त झाला आहे. या व्यवसायाला खूप मोठा वाव उपलब्ध आहे. हा व्यवसाय स्वतंत्ररीत्या स्वत:चा दवाखाना किंवा हॉस्पिटल काढून करता येतो किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार, सैन्य दले इ. ठिकाणी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात संशोधनाला चांगला वाव असून त्यासाठी परदेशातील विद्यापीठांतून मोठमोठय़ा स्कॉलरशिप्स दिल्या जातात. वैद्यकीय क्षेत्रात अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा अनेक शाखा आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी १२वी सायन्सच्या परीक्षेत केवळ उत्तम गुण मिळवून भागणार नसून रुग्णांच्या सेवेची आवड, शरीरप्रकृती धडधाकट, चांगली बुद्धिमत्ता, जबाबदारीची जाणीव, उत्तम स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, सारासारविवेक, निर्णयक्षमता, धीर धरण्याची क्षमता, स्वनियंत्रण आणि सतत आनंदी राहण्याचे कसब या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
अ) एम. बी. बी. एस. : १२वी सायन्सला जर भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण असतील तर या कोर्सला प्रवेश मिळू शकतो. काही महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी मात्र अखिल भारतीय स्तरावर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि या प्रवेश परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. याबाबतची जाहिरात भारत सरकारकडून प्रसिद्ध होणाऱ्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दरवर्षी प्रसिद्ध होते. हा कोर्स एकूण ४।। वर्षांचा असून प्रत्यक्ष पदवी मिळविल्यानंतर पुढे एक वर्ष व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप करावी लागते.
महाराष्ट्रात एम. बी. बी. एस.च्या अभ्यासक्रमासाठी पुढील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो :
१. बी. जे. मेडिकल कॉलेज (ससून हॉस्पिटल), पुणे- ४११००१. दू. क्र. : (०२०) २६१२८०००, २६१२६०१०.
२. भारती विद्यापीठ, धनकवडी, पुणे.
Web. : www.bharatividyapeeth.edu
३. ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई.
४. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई- ४०० ०८८.
५. सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, परळ, मुंबई- ४०० ०१२.
६. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, मुंबई- ४०० ०२२.
७. R.A.E.S. मेडिकल कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील विद्यानगर, सेक्टर नं. ७, नेरूळ, नवी मुंबई- ४००७०६.
८. महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, नवी मुंबई.
९. डॉ. वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूर- ४१३००५.
१०. कृष्णा इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराड, जि. सातारा- ४१५११०.
वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा (Premedical Examination- CBSE) :
भारत सरकार, राज्य सरकार आणि विविध कॉर्पोरेशन्सनी चालविलेल्या एम. बी. बी. एस. व बी. डी. एस. कॉलेजमधील १५% गुणवत्ता प्रवेशासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात अखिल भारतीय पातळीवर प्री-मेडिकल आणि प्री-डेन्टल परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी हा १०+२ पातळीवरील एच. एस. सी. (सायन्स) परीक्षा उत्तीर्ण असायला हवा. १२वीला त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ५०% गुण मिळालेले हवेत;ं परंतु मागासलेल्या जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४०% गुणांची आहे. या प्रवेश परीक्षेसाठी CANARA BANK A/C CBSE, New Delhi या नावाने रु. १० चा डिमांड ड्राफ्ट काढून तो रु. १२ ची पोस्टाची तिकिटे लावलेल्या, स्वत:चा पत्ता लिहिलेल्या १२’’१०’’ आकाराच्या पाकिटासह अर्जाचा फॉर्म मिळण्यासाठी पुढील पत्त्यावर पाठवावा.
ALL INDIA PRE-MEDICAL/ PRE-DENTAL ENTRANCE EXAMINA- TION UNIT, CBSE 17-B INDRA PRASTHA ESTATE, NEW DELHI- 110001.
सदर प्रवेश परीक्षेसाठी मुंबई आणि नागपूरबरोबरच मद्रास, दिल्ली, पणजी, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, भोपाळ, चंदिगढ इ. ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. सदर परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजी या विषयांचा एकत्र अडीच तासांचा एक ८०० गुणांचा पेपर असून त्यात २०० वैकल्पिक प्रकारचे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाखाली तीन/चार उत्तरे दिलेली असतात. त्यातील बरोबर उत्तर द्यावयाचे असते. सदर प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज फेब्रुवारीमध्ये बोर्डाकडे पोहोचणे आवश्यक आहे.
*ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली यांच्याकडून एम. बी. बी. एस. प्रवेशासाठी जूनमध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि हैदराबाद या केंद्रांवर ५० जागांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रवेश परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयॉलॉजी आणि जनरल नॉलेज हे विषय असतात आणि पेपरमधील प्रश्न वैकल्पिक स्वरूपाचे असतात. सदर परीक्षेसाठी विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयॉलॉजी आणि इंग्रजी या विषयात ६० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण (मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५०%) असलेला वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त आणि १७ वर्षे पूर्ण झालेला असावा. अर्जाचे फॉर्म जानेवारी/ फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतात. परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर होतो. अर्जाचा फॉर्म मिळण्यासाठी पत्ता- ALL INDIA INSTITUTE OF MEDICSL SCIENCES, NEW DLHI- 110029. दूरध्वनी क्र. (०११) २६५८८५००, २६५८८७००, २६५८९९००. संकेतस्थळ : www.aiims.edu
* महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा, महाराष्ट्र यांच्याकडून मे महिन्यात ६४ जागांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयोलॉजी आणि गांधी विचार या चार विषयांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ५०% जागा राखीव आहेत. विद्यार्थी हा १७ वर्षे वयाचा आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयॉलॉजी आणि इंग्रजी या विषयात ५०% गुणांसह (मागासलेल्या जातीच्या उमेदवारांसाठी ४०%) १२ वी उत्तीर्ण असावयास हवा. सदर प्रवेश परीक्षेसाठी अर्जाचे फॉर्म जानेवारी ते एप्रिल या काळात पुढील पत्त्यावर मिळू शकतात-
MAHATMA GANDHI INSTITUTE OF MWDICAL SCIENCES, P.O. SEVAGRAM, WARDHA [MAHARASHTRA] 442102.
परीक्षा मे महिन्यात होते. निकाल जुलैमध्ये जाहीर होतात. परीक्षा केंद्रे- नागपूर, दिल्ली, हैदराबाद.
* आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे यांच्याकडून मुलांसाठी १०५ आणि मुलींसाठी २५ जागांसाठी मे महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयॉलॉजी, लॉजिक, इंटेलिजन्स आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा पुणे, मुंबई, आग्रा, अहमदाबाद, कोचीन, जबलपूर या केंद्रात घेतली जाते. प्रेश परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित संबंधित विद्यार्थ्यांना पुणे, दिल्ली, कोलकत्ता यापैकी एका केंद्रावर मुलाखतीसाठी बोलाविले जाते. सदर परीक्षेसाठी विद्यार्थी १७ ते २२ दरम्यान वयाचा असावा. तो भारतीय नागरिक, मानसिकदृष्टय़ा सक्षम, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयॉलॉजी या विषयात ५०% व इंग्रजी विषयात ४५% आणि एकूण ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा. मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी १० जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज- THE OFFICERS IN CHARGE, ARMED FORCES MEDICAL COLLEGE, SHOLAPUR ROAD. PUNE. PHONE NO- [020] 26811205, 26306030. संकेतस्थळ- http://armedforces.nic.in यांच्याकडून पोस्टाने ३१ जानेवारीपर्यंत मिळू शकतात. त्यासाठी योग्य ती फी commandant AFMC, Pune या नावाने काढलेल्या बँक ड्राफ्टने भरावी लागते.
ब) बी. ए. एम. अ‍ॅण्ड एस. : हा कोर्सही मेडिकलचाच असून एम. बी. बी. एस.प्रमाणेच वैद्यकीचा स्वतंत्र व्यवसाय करता येतो. एम. बी. बी. एस.चा कोर्स अ‍ॅलोपॅथीचा असून बी. ए. एम. अ‍ॅण्ड एस. हा कोर्स आयुर्वेदाचा आहे. या कोर्सला भारताप्रमाणेच भारताबाहेर चांगला वाव आहे. हा कोर्स पाच वर्षे तीन महिने मुदतीचा आहे. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी पुढील कॉलेजमध्ये संपर्क साधावा-
१) टिळक आयुर्वेद महाविद्यालय, ५८३/२ रास्ता पेठ, पुणे- ४११०११.
२) अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, २०६२, सदाशिव पेठ, विजयनगर कॉलनी, पुणे- ४११०३०.
३) महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे, आयुर्वेदिक महाविद्यालय, हडपसर, माळवाडी, पुणे- ४११०३०.
४) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड रिसर्च सेन्टर, टिळक रोड, सेक्टर नं. २७. सिंधुदुर्ग बस स्टॉपजवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४.
५) भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आयुर्वेद, एरंडवणे, पुणे- ३८.
६) आयुर्वेदिक महाविद्यालय, सायन, मुंबई- ४०००१८.
७) आर. ए. पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज, वरळी, मुंबई- ४०००१८.
८) श्री कमलादेवी जी. मित्तल पुनर्वसू आयुर्वेदिक कॉलेज, मुंबई- ४००००२.
९) आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक- ४२२००१.
१०) वसंतदादा आयुर्वेद महाविद्यालय, सांगली- ४१६४१६.
११) राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय, अकोला- ४४४००४.
१२) एस. सी. मुथा आर्याग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा- ४१५००२.
१३) शेठ गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर- ४१३००२.
क) बी. एच. एम. एस. : हा होमिओपॅथीचा मेडिकलचाच कोर्स असून अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाप्रमाणे स्वतंत्र प्रॅक्टिस करता येते. हा कोर्स चार वर्षे सहा महिने मुदतीचा असून पुढे एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते. या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महाविद्यालयांशी संपर्क साधावा-
१) डी. एस. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, एफ. पी. नं. २३ ऑफ कर्वे रोड, पुणे- ४११००४.
२) भारती विद्यापीठाचे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एरंडवणा, पुणे- ४११०३८.
३) लोकमान्य मेडिकल फौंडेशनचे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, चिंचवड, पुणे- ४११०३३.
४) श्रीमती चंदाबेन मोहनभाई पटेल, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, विलेपार्ले मुंबई- ४०००५६.
५) होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, धामणगाव, अमरावती.
६) जनता होमिओ व बायोकेमिकल मेडिकल कॉलेज, अकोला.
ड) डी. एच. एम. एस.: हाही होमिओपॅथीचाच डिप्लोमा असून कालावधी ४।। वर्षांचा आहे. याची सोय पुढील ठिकाणी आहे-
१) धोंडूमामा साठे, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, कर्वे रोड, पुणे- ४११००४.
२) होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, चिंचवड, पुणे- ३३.
३) भारती विद्यापीठाचे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, धनकवडी, पुणे.
४) समर्थ एज्युकेशन सोसायटीचे होमिओपॅथिक कॉलेज, अदालत वाडा, सातारा.
५) होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, कोल्हापूर.
६) वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक कॉलेज, कोल्हापूर.
इ) बी. डी. एस. : हा चार वर्षांचा कोर्स असून तो डेंटल सर्जरीमधील आहे. दात आणि जबडा सरळ करणे (orthodentist); हिरडय़ांची काळजी (teriodontics), कॉस्मॅटिक सर्जरी, कृत्रिम दात तयार करणे, तोंड आणि जबडय़ाचे ऑपरेशन या क्षेत्रात स्पेशलायझेशन करण्यास वाव उपलब्ध आहे. या कोर्ससाठी स्वतंत्र व्यवसाय करण्यास तसेच सैन्यदल, रेल्वे, खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. याबाबत पुढील ठिकाणी संपर्क साधावा-
१) आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे- ४११००१.
२) भारती विद्यापीठाचे डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, कात्रज, धनकवडी कॉम्प्लेक्स, पुणे- ४१३०४३.
३) नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, भायखळा, मुंबई- ४००००८.
४) गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, मुंबई- ४००००१.
५) आर. ए. डेंटल कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील विद्यानगर, सेक्टर ७, नेरुल, मुंबई- ४००७०६.
६) महात्मा गांधी डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, पंचवटी, नाशिक.
ई) बी. फार्म : फार्मसीचा हा अभ्यासक्रम औषधे शोधून काढणे, तयार करणे, त्यांच्या शुद्धतेची आणि ताकदीची तपासणी करणे, डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे रुग्णाला औषधांची विक्री करणे, डॉक्टरांना औषधविषयक सल्ला देणे इ. कार्याशी संबंधित आहेत. त्यातच पुढे एम. फार्म केल्यानंतर औषधी कंपन्यांत औषधनिर्मिती/ उत्पादन प्रमुख म्हणून नोकरी मिळू शकते; संशोधनास वाव मिळू शकतो. या क्षेत्रात जाण्यासाठी चांगली बुद्धिमत्ता, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, मनाची शास्त्रीय बैठक, एकाग्रता, जबाबदारीची जाणीव, धीर धरण्याची तयारी, भरपूर कष्ट करण्याची तयारी हे गुण अंगी असणे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी पुढील संस्थांशी संपर्क साधावा-
१) भारती विद्यापीठाचे पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवण, पुणे- ४११०३८.
२) वाघीरे कॉलेज, सासवड, पुणे.
३) बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कालिना, सांताक्रूझ, मुंबई- ४०००९८.
४) रामराव आदिक एज्युकेशन सोसायटी, वाशी (नवी मुंबई).
५) कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, वरळी सी फेस, मुंबई- ४०००२५.
६) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड- ४१५११०.
७) गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, पणजी, गोवा- ४०३००१.
८) कॉलेज ऑफ फार्मसी, बोरगाव मेपे, जि. वर्धा.
९) नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी, अत्रे लेआऊट, नागपूर- ४४००२२.
१०) मद्रास मेडिकल कॉलेज, पार्क टाऊन, चेन्नई- ६००००३.
ओ) बी.एस्सी. (नर्सिग) : नर्सिग हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे. या व्यवसायात कामाचे समाधान फार मोठे असते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आरोग्य चांगले हवे, धडधाकट प्रकृती, रुग्णांबद्दल कळवळा, लवचिकता, धीर, सर्व लोकांच्यात मिसळण्याची कुवत, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, जबाबदारीची जाणीव, कष्ट करण्याची तयारी या गोष्टींची आवश्यकता आहे.
याची सोय पुढील ठिकाणी आहे-
१) लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिग, एस. एन. डी. टी. विमेन युनिव्हर्सिटी, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.
२) परिचारिका प्रशिक्षण केंद्र, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई- ४००००१.
३) पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबई.
४) जनरल हॉस्पिटल, सातारा.
५) धनराज गीरजी हॉस्पिटल, सोलापूर.
पुष्कर मुंडले
मो. ९९६९४६३६१०