Leading International Marathi News Daily शनिवार,१४ मार्च २००९
  चिनी खेळण्यांशी रेस
  खेळण्यांच्या दुनियेत खळबळ
  खेळ आणि विकासाचा मेळ
  भय इथले संपत नाही
  घेतला वसा...
  विज्ञानमयी
  वंचितांच्या आरोग्यप्रशानांची दाहकता
  तेलांचा वापर आणि मिसळण
  होरी रंगरंगीली
  प्रतीक्षेत होती ती
  हवेत ‘लिबरल’आजी-आजोबा
  प्रतिसाद
  तुळशीचे बनी, जनी उकलिते वेणी
  विलपॉवर
  अश्रूंचा ‘रिलीफ’
  नितांतसुंदर कशिदाकारी
  दुर्गम सियाचीनची सायकल सफर

समानतेसाठी आम्ही!

स्त्री-पुरुष समानतेसाठी मी स्वत: काय करतो/ करते? लिंगविशिष्ट भूमिकांना मी चिकटून राहत नाही, लिंगभेद मानत नाही, हे आपण स्वत: कोणत्या कृतींतून व्यक्त करता? तुमचे स्वानुभव कमाल १५० शब्दांत १७ मार्चच्या आत लिहून कळवा. हे आवाहन महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा आहे की अशा आवाहनांना पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्के सोडाच, पण जेमतेम ३ टक्केही मिळत नाही. हे प्रमाण वाढावे, अधिकाधिक वाचकांनी स्वत:तील बदलाचे चाकोरीबाहेरचे ठोस दाखले प्रांजळपणे द्यावेत, ही अपेक्षा. घरातील मुला-मुलींना, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता, हे स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. निवडक लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. आपले स्वानुभव कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्य अक्षरात लिहून पाठवा.
पत्ता- ‘समानतेसाठी आम्ही’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट,
मुंबई ४०००२१.

  घरात भावंडांबरोबर भातुकली किंवा लगोऱ्या, आटय़ापाटय़ांचा खेळ कालानुरूप लहान लहान होत गेलेल्या विभक्त कुटुंबातून केव्हाच नाहीसा झाला. आणि आता एकेकटय़ा, भावंडं नसलेल्या मुलाला विभक्त कुटुंबातील नोकरदार आई-बाबामुळे मायेच्या सहवासाची उणीव वाटू लागली. ती भरून काढतील अशी भरपूर खेळणी उपलब्ध करून देण्याचा आता आई-वडीलांचा प्रयत्न असतो. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातील मुलांना अगदी बॅटरी ऑपरेटेड स्वयंचलित गाडय़ांपासून ते बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या मेकॅनोपर्यंत भरपूर खेळणी उपलब्ध करून दिली जातात.
आधुनिक खेळणी हा प्रकार तसा महागडाच. त्यातही प्रसिद्ध ब्रँडस्ची खेळणी जास्तच महाग असतात. त्याला पर्याय पुरवला चिनी खेळण्यांनी. बघता बघता भारतीय खेळण्यांच्या बाजारातील निम्म्याहून अधिक जागा या चिनी बनावटीच्या खेळण्यांनी व्यापली. स्वस्त आणि आकर्षक अशी ही चिनी खेळणी आई-वडिलांच्या खिशालाही परवडत असल्याने साहजिकच ग्राहकांच्या पसंतीला उतरली.
कालांतराने या चिनी खेळण्यांच्या अंतरंगात डोकावल्यानंतर त्यांची वैगुण्ये जाणवू लागली. विशेषत: PVC मध्ये वापरण्यात येणाऱ्या शिसे आणि कॅडमिअम या धातूंचा लहान मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, हे भारतीयांच्या लक्षात आले आणि भारत सरकारने चिनी खेळण्यांवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली. गेले दोन महिने त्यावर बराच काथ्याकूट झाला आणि आता भारताने चिनी खेळण्यांवरची सरसकट बंदी उठवली आहे.
भारतीय खेळण्यांच्या तुलनेत हानिकारक आणि कमी आयुष्य असणारी असूनही कमी किंमत व आकर्षकपणा ही चिनी खेळण्यांची बलस्थाने. या खेळण्यांना पुरेसा पर्याय उपलब्ध करून देण्याइतपत भारतीय खेळणी बाजार समृद्ध आणि सज्ज झाला आहे का? Non-toxic खेळणी हवीत म्हणून चिनी खेळण्यांवर बंदी घातलेल्या भारतातील खेळणी बाजारात देशी बनावटीची खेळणी तयार करताना त्या संदर्भातील सुरक्षेचे काही नियम किंवा मापदंड या उत्पादकांसाठी बंधनकारक आहेत का? मुळात सर्व वयोगटांना साजेशी भारतीय खेळणी बाजारात उपलब्ध आहेत का? पालकांना त्यांच्या मुलांसाठी वयोगटाचा विचार करता योग्य-अयोग्य खेळणी आणि खेळ कोणते असू शकतात याबाबत माहिती देण्याचा, प्रबोधन करण्याचा प्रयत्न या देशी उत्पादकांनी केलाय का?
 
माटुंग्यात वृंदा संघवी ‘उन्नती’ ही मुलांसाठी पुस्तकांची व शैक्षणिक खेळण्यांची लायब्ररी चालवतात. त्यांच्या मते केवळ toxic म्हणून जर चिनी खेळण्याना आक्षेप घ्यावा, तर भरतीय उत्पादकांकडूनही म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही. तसेच भरतीय खेळण्यांत चिनी खेळण्यांइतकी विविधताही पाहायला मिळत नाही. चीनमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेला कामगारवर्ग, प्रचंड मोठय़ा प्रमाणावर होत असलेले उत्पादन आणि दर्जाच्या दृष्टीने कमी असलेली मालाची प्रत यामुळे चिनी खेळण्यांच्या किमती कमी असतात. शिवाय रंगसंगती आकर्षक असते. वृंदाताईंच्या मते खेळणी हाताळणाऱ्या छोटय़ा मुलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा विचार करता, चिनी काय किंवा भारतीय काय, एकंदर खेळणी उत्पादकांसाठी काही नियम किंवा मापदंड आपल्या देशाने तयार केलेले नाहीत.
अमेरिकेतल्यासारखे खेळण्याच्या पॅकिंगवर ते खेळणे कोणत्या वयोगटासाठी योग्य आहे, याची माहिती दिलेली असते. ती पध्दत आजकाल भारतातही रुजली आहे. खेळण्यांच्या पॅकवर मुलांचा अपेक्षित वयोगट छापलेला असतो. पण वृंदा संघवी यांच्या मते मुलाचे वय हा महत्त्वाचा निकष होऊ शकत नाही. कारण त्यांच्या लायब्ररीत येणाऱ्या मुलांचा अभ्यास करता त्यांनी असा निष्कर्ष काढलाय की प्रत्येक मुलाची बौद्धिक, मानसिक व शारीरिक कुवत वेगळी असते आणि त्यामुळे एकाच वयाची दोन मुले एक खेळणे (विशेषत: बुद्धीला चालना देणारा एखादा गेम) सारख्याच कौशल्याने किंवा क्षमतेने खेळू शकतील असे नाही.
वृंदाताईंच्या लायब्ररीत मुख्यत्वे शैक्षणिक, बौद्धिक विकासाला चालना देणारी तसेच मुलांच्या शारीरिक हालचाली विकसित करणारी खेळणी आहेत. उत्पादकांकडून विकत घेण्याव्यतिरिक्त त्या स्वत:ही आपल्या कल्पना वापरून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कारागिरांकडून खेळणी बनवून घेतात. मुलांसाठी कोणती खेळणी घ्यावीत याबाबत वृंदाताई त्यांच्याकडे येणाऱ्या पालकांना चांगले मार्गदर्शन करतात. अगदी एखादा गेम कसा खेळावा, हेही त्या सांगतात.
याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे माझ्याशी बोलत असताना जवळच एक छोटा मुलगा लाकडाच्या हातोडीने लाकडी ठोकळे ठोकण्याचा खेळ खेळत होता. तिकडे अंगुलीनिर्देश करत त्या म्हणाल्या की, मुलांचे ठोकणे, कानठळ्या बसवणारे आवाज करणे असे खेळ मोठय़ा माणसांच्या कितीही नापसंतीचे असले तरी हल्ली मानसोपचार तज्ज्ञही अशा खेळांची शिफारस मुलांसाठी करतात. कारण असा खेळ म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी दडलेल्या चीड, संताप या भावनांचा एक प्रकारे निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहे.
वर्धमान आयक्यू टॉईज या नावाची छोटेखानी कंपनी चालवणाऱ्या बेलाबेन यांच्या मते, चिनी खेळण्यांच्या भारतीय बाजारातील प्रभावी आक्रमणातून भारतीय खेळणी उत्पादक बरंच काही शिकले आहेत. उत्पादन, मार्केटिंग, प्रेझेंटेशन- या संदर्भात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक कौशल्ये चिनी उत्पादकांकडून नक्कीच शिकण्यासारखी आहेत. भारतातील बहुसंख्य खेळणी उत्पादक मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडतील अशी खेळणी तयार करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कोणते खेळणे कोणत्या वयोगटाच्या मुलांना उपयोगी आहे किंवा एखादे खेळणे मुलांच्या सर्वागीण विकासासाठी कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते यासंबंधी पालकांना मार्गदर्शन करणाऱ्या साईटस्ही आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. बेलाबेन यांच्या कंपनीचीही vardhamaniqtoys.com ही साईट इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यांच्या मते चिनी खेळण्यांशी स्पर्धा करणे हे भारतीय खेळणी उत्पादकांसाठी एक आव्हान आहे. अलीकडे पालकांचाही एक मोठा वर्ग असा तयार होऊ लागलाय, जे चिनी बनावटीच्या, आकर्षक आणि स्वस्त खेळण्यांच्या आहारी न जाता भारतीय बनावटीच्या चांगल्या दर्जाच्या, टिकाऊ खेळण्यांचा आग्रही असतो.
वृंदाताई आणि बेलाबेन या दोन्ही उद्योजक महिलांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की खेळणी तयार करताना मुलांचा वयोगट, आरोग्य, सुरक्षा तसेच मुलांच्या सार्वत्रिक विकासाला खेळण्यांमधून चालना मिळण्याची गरज या गोष्टींचा विचार उद्योजकांनी करणे अतिशय आवश्यक आहे. बालमानसशास्त्र आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कल्पकतेचा आणि अभ्यासाचा उपयोग खेळणी उत्पादकांना होऊ शकतो. त्यासाठी खेळणी उत्पादकांनी अशा व्यक्तींशी संवाद साधणे आवश्यक आहे. भारतीय खेळणी बाजार अद्याप बाल्यावस्थेत आहेत. चिनी खेळण्यांनी निर्माण केलेल्या स्पर्धेत उतरून भारतीय बाजारपेठेने अधिक सशक्त होणे गरजेचे आहे.
शुभदा देशपांडे