Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

कोलकाता येथील महाराष्ट्र निवासाचा अमृतमहोत्सवानिमित्त सागर वार्षिकाचा विशेषांक
मुंबई, १४ मार्च/ प्रतिनिधी

कोलकाता येथील महाराष्ट्र निवासाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्ताने येथील महाराष्ट्र मंडळातर्फे

 

काढण्यात येणाऱ्या सागर या वार्षिकाचा महाराष्ट्र निवास अमृत महोत्सव विशेषांक प्रकाशित केला आहे. सागरचे हे ३० वर्ष असून कोलकाता येथे राहणाऱ्या, स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मराठी जनांनी महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र निवास याचे काम चांगलेच चालविले आहे.
गेल्या महिन्यात ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र निवास ट्रस्टला ७५ वर्षे पूर्ण झाली. २५ ऑक्टोबर १९२४ रोजी महाराष्ट्र मंडळ संस्था काढण्याचे ठरले त्यानंतरची वाटचाल तसेच महाराष्ट्र मंडळ व महाराष्ट्र निवासाची निर्मिती कशी झाली, लोकांचे अनुभव कसे होते अशा माहितीपूर्ण लेखांबरोबरच प्रवासवर्णन, ललित लेख, स्मृतिचित्रे यांचाही या विशेषांकात समावेश आहे. कुमुद रेखडे यांनी अंकाचे संपादन केले आहे. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष तुषार ठवरे असून कोलकातामधील महाराष्ट्रीय लोकांची महाराष्ट्र मंडळाच्यावतीने कशी एकजूट आहे, तेथे कोणकोणते उपक्रम केले जातात, लोकांचा उत्साहही चांगला असतो, असे अनुभवही अंकात देण्यात आले आहेत. महाराष्ट्रामधून कोलकात्याला जाणाऱ्या मराठी लोकांनाही हा अंक माहितीपूर्ण ठरावा.