Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

‘मेरे पास मां हैं’
लक्ष्मीकांत देशमुख

ऑस्कर पुरस्काराचा तो दिवस आणि ए. आर. रहमान यांना गीत व संगीतासाठी मिळालेले दोन पुरस्कार हा क्षण भारतीय माणसं कधी विसरू शकणार नाहीत. कितीही म्हटलं तरी ज्या पुरस्कारानं भारताला अगदी थेट ‘मदर इंडिया’च्या जमान्यापासून व अलीकडच्या काळात ‘लगान’च्या वेळी हुलकावणी दिली होती, तो पुरस्कार मिळविण्याची किमया घडवून आणली ती अल्लारखा रहमान यानं. त्याची सांगीतिक प्रतिभा अव्वल दर्जाची होती, म्हणूनच हा बहुमान त्याला मिळाला हे निर्विवाद!

निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला..
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे कळताच त्यांचे समर्थक शुक्रवारी सायंकाळपासून कामाला लागले. काँग्रेसची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती येत्या एक-दोन दिवसात जाहीर होण्याचा अंदाज आहे.
दिल्लीत मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत नागपूरसह अन्य जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले. हा निरोप येताच कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले. त्यांच्या समर्थकांनी आता खऱ्या अर्थाने प्रचारास प्रारंभ केला. मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात त्यांचे मतदान आहे, याची माहिती व्हावी, यासाठी विलास मुत्तेमवार यांच्या संकेतस्थळाचा प्रचार करणारी वाहनेही सायंकाळपासून शहरात फिरू लागली आहेत.

मतदानाबाबत जागृतीसाठी २८ मार्चला ‘युथ मार्च फॉर चेंज’
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

तरुणांच्या मनात मतदान आणि नकारात्मक मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘युथ मार्च फॉर चेंज’ २८ मार्चला आयोजित केलाअसल्याची माहिती युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आशीष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दहशतवादरोधक पथक भंडाऱ्यात येणार
भंडारा, १४ मार्च / वार्ताहर

येथे संशयास्पद स्थितीत वावरताना पकडल्या गेलेल्या जम्मू-काश्मीरमधील गुलाबनबी मोहम्मद बशीर गुजर (३२) आणि रियास अहमद वलीम मोहम्मद (१९) यांच्या अधिक चौकशीकरिता ए.टी.एस.ला पाचारण करण्यात आले असून लवकरच दहशतवादरोधक पथक येथे येणार असल्याचे समजते.

निर्धनराव वाघाये स्मृतीदिन
भंडारा, १४ मार्च / वार्ताहर

निर्धनराव वाघाये यांच्या स्मृती दिनानिमित्त चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे उपस्थित होत्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप, ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिकेचे हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते लाखनी सैनिकी शाळेतील जलतरण तलावाचे भूमिपूजन केले.

डॉ. दिनेश केसकर यांचा आज सत्कार
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

नागपुरातील सर्व १६ रोटरी क्लबच्यावतीने बोईंग इंडियाचे अध्यक्ष व बोईंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांचा उद्या, रविवारी ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरव करण्यात येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बोईंगच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. केसकर पहिल्यांदाच नागपुरात येत असून त्यानिमित्ताने हा सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात त्यांची उपाध्यक्षपदावरून अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भारतात बोईंगच्या विस्तारासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बोईंगचा प्रवास तसेच, विमानांच्या देखभाल व दुरुस्ती केंद्राच्या माध्यमातून नागपूरच्या विकासाला कसा हातभार लागणार आहे, यावर ते प्रकाश टाकतील. रोटरीचे सर्व सदस्य व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प संचालक विपिन राठी यांनी केले आहे.

मंगळसूत्र व सोनसाखळी खेचली
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी
पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी खेचल्याची घटना बडकस चौकातून संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. रमा भगवतीलाल त्रिवेदी (रा़ संघ मुख्यालयाजवळ) या त्यांच्या मुलीला शिकवणी वर्गामधून आणण्यासाठी जात असता मागून आलेल्या मोटारसायकलवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चेन हिसकली़ हे लक्षात आल्याने त्रिवेदी यांनी हात गळ्याजवळ नेला आणि मंगळसूत्र घट्ट पकडले. तरीही अर्धे मंगळसूत्र व अर्धी सोनसाखळी खेचण्यात लुटारू यशस्वी झाले. २१ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याच्या तक्रारीवरून अनोळखी लुटारूंविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला़

निसर्गवादी चित्रकार
हिरव्या नागपुरातला मॉर्निग-इव्हिनिंग वॉक सुखद असतो. ऋतूचं आगमन फिरताना न सांगताही दिसतं, अनुभवता येतं वातावरणातून. झाडाच्या पानांचा बदलणारा रंग, पक्ष्यांचा आवाज आणि आगमन व स्थलांतरातून दिसून येतो प्रत्येक ऋतू स्वत:च्या वैशिष्टय़ांसह. ‘वसंता’ची चाहूल वाऱ्याने होते न होते तोच सिमेंटच्या डांबराच्या रस्त्यावर झाडाची पानं, फुलं, बिया, पक्ष्यांची पिसं दिसू लागतात.

वनवैभवातील झगमगता हिरा - नागझिरा
नागपूरपासून अवघ्या १३० किमी असलेल्या नागझिराचा फेरफटका म्हणजे स्वर्गीय आनंदानुभव. येथील दाट वृक्षराजींमधून फिरण्याचा आनंद काही औरच. मध्यंतरी दोन व्याघ्रगणनांच्या काळात नागझिराचे जंगल फिरण्याची संधी मिळाली. नागझिरा हे जैववैविध्यतेचे सुंदर मिश्रण आहे. तिरोडा रेंजमध्ये १५२.८१० चौरस किमी परिसरात विस्तारलेले नागझिरा म्हणजे विदर्भाचा स्वर्ग. नागझिऱ्याला दरवर्षी किमान ३० हजार देशी-विदेशी पर्यटक भेट देतात.

डिसनी लँड
एका प्रवासी कंपनी सोबत अमेरिकेत भ्रमणासाठी आम्ही सगळे गेलो. आधाश्यासारखं आम्ही खूप खूप बघितलं आणि खूप मजादेखील केली. रात्रीचे जेवण घेताना आमचा वाटाडय़ा म्हणाला, ‘उद्या सकाळी साडे आठला सगळे तयार व्हा. उद्या सकाळी आपल्याला डिसनी लँडला जायचे आहे.’ डिसनी लँड ऐकल्यावर आम्ही लहान मुलांसारखे उत्साहित झालो. सकाळी साडे आठच्या आधीच आम्ही आमच्या प्रवासी बसमध्ये स्थानापन्न झालो. तासाभरात आम्ही डिसनी लँडला पोहोचलो.

शिंक्यातलं लोणी खाल्लं कुणी?
नणदा भावजया दोघी जणी दोघी जणी
घरांत नव्हतं तिसरं कुणी तिसरं कुणी
नणंद:- आता माझा दादा येईल गं, येईल गं, वहिनीचं गाऱ्हाणं सांगीन गं ‘दादा तुझी बायको चोरटी-चोरटी
दादा:- घे काठी लगाव पाठी
नणंद:- घरादाराची लक्षुमी मोठी- लक्षुमी मोठी
अगदी अधिकारानं एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करतानाच कधीही टोकाचा वाईटपणा येणार नाही हा विश्वास असलेलं. एकमेकींना पूरक-कारक असं मैत्रीचं नातं नणंदा भावजयीचं. आत्मविश्वासानी वहिनीचं गाऱ्हाणं दादाशी करताना दादानं वहिनीला सजा सुनावली तर लगेच या घरच्या लक्षुमीपणाची आठवण वर दादालाच करून देणारी त्याची लाडकी बहीण, घराचं चैतन्य, आणि वहिनीची कायम निंदक समीक्षक नणंद.

मॅडम
रोजच्यासारखी तुरुंगातली डाक आली. प्रज्ञा मॅडमकडे पत्र देताना उघडय़ा पोस्टकार्डवर माझी नजर गेली.
‘आई मला तुझी खूप आठवण येते, तू केंव्हा येशील?’ माझ्या डोळ्यासमोर पाण्याचा पडदा झाला. मी पुढे वाचू शकले नाही. ८ व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आपल्या शिक्षिका आईला लिहलेलं ते पत्र होतं.

उत्सर्ग आणि प्राणाश्म पाकळी
‘चांदणी चाळण आईच्या हाती असायची. फुंकणीची धून खोंदारी धुरात वाजायची. वलाणीवर वाळत घातलेल्या जुनेरातील इंद्रधनूने केलेली रंगांची चोरी व त्या पाठीमागून पळालेला सूर्यही दिसायचा.

‘मधमाशी!’
छोटा मोहित! त्याच्या बालमनाला खरंच वाटलं सगळं! तो आजीला विचारू लागला, ‘होऽऽ पणजीकडे खरंच असं ‘इन्व्हिजिबल’ घडय़ाळ आहे?’ मोहितच्या मोठय़ा डोळ्यातलं आश्चर्य पाहून सर्वानाच हसू आलं. तसे मोहितचे आजोबा त्याला आपल्या मांडीवर बसवत म्हणाले, ‘मोहित बेटा! असं एकच गुप्त घडय़ाळ आहे आणि ते आहे देवाजवळ! सूर्याच्या किरणांचे काटे असलेलं आणि पृथ्वीच्या फिरण्यावर (परिवलनावर) चालणारं!’ मोहितला यातलं काऽऽही समजलं नव्हतं. निरागस चेहऱ्यानं डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन एकटक आपल्या आजोबांकडे तो पहात होता.

ज्ञान, अज्ञान आणि आनंद
साडी खरेदी करणं म्हणजे एक दिव्यच. दहा दुकानं पालथी घालायची, दिवस घालवायचा, ‘तुमच्यासारख्या भिकार लोकांनी काय खरेदी करावी? तुमची औकातच नाही,’ अशा अर्थाच्या दुकानदाराच्या नजरा सहन करायच्या आणि मग दिवस कारणी लावण्यासाठी एखादी पसंत करायची. अशा या दिव्यातून जात परवा एक साडी खरेदी केली. पॅटर्न, पोत, रंगसंगती सगळं कसं नवीन वाटलं. किंमतही वाजवी. बऱ्यापैकी आनंदात होते. हौसेनं नेसले. कौतुकभरल्या, ईर्षांभरल्या नजरांच्या कल्पनेत तरंगतच बाहेर पडले. मैत्रीण म्हणाली, ‘‘तूही घेतलीस ही साडी? सगळीकडे झालंय हे पॅटर्न.’’ एवढं म्हणून थांबली नाही ती. किंमत विचारली आणि त्यावर मोलाचं भाष्य केलं, ‘‘किमान दीडशे रुपयांनी महाग लागली. त्या ‘लाजरी’मध्ये फक्त साडेचारशेला घेतली परवा माझ्या भाचीने.’’ झालं माझ्या आनंदाचं दूध नासलं. मी फसले होते याचं ज्ञान झालं आणि आनंद संपला.

एकाग्रता
सध्या सर्वत्र परीक्षेचे वातावरण आहे. बारावीची परीक्षा आटोपली आणि दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. शाळेतल्या इतर वर्गाच्याही परीक्षा सुरू झाल्या आहेत, विद्यापीठातील परीक्षांसाठी विद्यार्थी तयारीला लागले आहेत. एकूण काय की आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये रात्री उशीरापर्यंत अभ्यासासाठी जागणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे दिवे जळतांना दिसू लागले आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीचा तपशील एवढय़ासाठीच, कारण आज आपण परीक्षेतील यशासाठी लागणाऱ्या ‘एकाग्रता’ याविषयावर माहिती बघणार आहोत.

गंमत प्रयोगांची
प्रयोगाचे नाव- प्रकाशाचे वक्रीभवन (Refraction of light)
बालमित्रांनो, आनंद होतोय ना तुम्हाला प्रयोग करून बघताना? प्रयोग केल्याने, त्यामागील शास्त्रीय तत्त्व जाणून घेतल्याने कोणतीही गोष्ट का व कशी घडते, याचा बोध होतो. हा कार्यकारण भाव जर आपल्याला कळला तरच तुमचा व माझा प्रयोग करण्याचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल.

मी शेंगा खाल्ल्या नाही..
झुकू झुकू झुकू झुकू अगीन गाडी ।
धुरांच्या रेषा हवेत काढी ।।
पळती झाडे पाहू या ।
मामाच्या गावाला जाऊ या ।।
नागपूर आकाशवाणीवर कुंदाताई आणि अरविंद मामांचा ‘बालविहार’ प्रसारित होत होता. बंडूकाका वस्तीतल्या बाळगोपाळांसह रेडिओवर प्रसारित होणारी बालगीतं ऐकण्यात गुंग झाले होते. बाल-बालिकांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून त्यांनी आठवडय़ातून एकदा प्रसारित होणारा ‘बालविहार’ मनोभावे ऐकावाच, अशी त्यांची सक्त ताकीद असायची. बंडूकाकांमुळेच मुलांनाही ‘बालविहार’चा नाद लागला होता. एखाद्या रविवारी बालविहार प्रसारित झाला नाही तर मुले कासावीस होऊन जात. कुठल्याशा दुर्घटनेमुळे राष्ट्रीय शोक पाळण्याची घोषणा झाल्यामुळे आदल्या रविवारी बालविहारवर संक्रांत कोसळली होती. त्यामुळे आज बालविहार ऐकण्यासाठी फुल कोरम होता.