Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आधार’तर्फे २९ मार्चला ‘झी म्युझिशियन्स’चा संगीतमय नजराणा
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

‘आधार’ बहुद्देशीय संस्थेतर्फे २९ मार्चला झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या सारेगमप या लोकप्रिय कार्यक्रमातील आघाडीच्या वादक कलावंतांचा ‘झी म्युझिशियन’ हा संगीतमय कार्यक्रम सादर

 

करण्यात येणार आहे.
बासरी सम्राट अमर ओक यांच्या नेतृत्वाखाली निलेश परब (ढोलकी), आर्चिज लेले (तबला), महेश खानोरकर (व्हायोलीन), सत्यजित प्रभू (सिंथेसायझर), दत्ता तावडे (ड्रम, ऑक्टोपॅड) अशी संगीत वादनातील जाणकार मंडळी या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकत्र येणार असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे राहणार आहे. पुण्याचे मिलिंद कुळकर्णी हे निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा संगीतमय नजराणा रसिकांपुढे सादर करण्यात येणार आहे.
यावेळी विभागीय आयुक्त आनंद लिमये आणि पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पट्टीच्या वाद्यवृंदाच्या या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘आधार’चे अध्यक्ष डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर आणि शुभदा फडणवीस यांनी केले आहे. देणगी प्रवेशिका १७ मार्चपासून रोडे हॉस्पिटल, आशीर्वादनगर, रिंग रोड तसेच रक्षक इलेक्ट्रॉनिक्स सव्‍‌र्हिसेस, सिमेंट रोड, शिवाजीनगर येथे उपलब्ध राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८२२२२१७८८, ९८२२५७९५०९ किंवा ९८६०२८०२६८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.