Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बुधवारी ‘ह्य़ा गंगेमधी गगन वितळले’
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे १८ मार्चला नवकाव्याचे प्रवर्तक कवीवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांवर ‘ह्य़ा गंगेमधी गगन वितळले’ हा संगीतमय अविष्कार सादर

 

करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष गिरीश गांधी यांची असून संकल्पना, लेखन व निवेदन ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे आहे. याप्रसंगी मर्ढेकर यांच्या कवितांवर वैशाली उपाध्ये, सारंग जोशी आणि सुचिता कातरकर हे गायन करतील तर जयंत पात्रीकर आणि मनीषा साधू हे अभिवाचन करतील. अरविंद उपाध्ये, महेन्द्र ढोले, श्रीकांत सूर्यवंशी, प्रसन्न वानखेडे, रिकू निखारे, विशाल दशसहस्र यांची वाद्यसंगत राहणार आहे.
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी राहणार असून नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन विजय जिचकार, संजय कोंडावार, अनंत घारड, समीर मेघे, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. चंद्रभान भोयर, बबलू देवतळे, डॉ. सुनील रामटेके, प्रा. कोमल ठाकरे, डॉ. शरयू तायवाडे, हरिश्चंद्र आत्राम, देवेन्द्र गावंडे, नरेश माहेश्वरी, सुनील फुंडे, प्रा. नारायण निकम आदींनी केले आहे.