Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

होमिओपॅथी रुग्णालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

जगनाडे चौकातील नागपूर कॉलेज ऑफ होमिओपॅथी रुग्णालयात २००७ मध्ये घेतलेल्या बी.एच.एम.एस. अंतिम वर्षांच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच

 

सत्कार करण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे अध्यक्ष घनश्यामदास पनपालिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती सागरमल अग्रवाल, विल्मर श्वॉबे इंडिया प्रा.लि.चे प्रतिनिधी त्रिपेश मिश्रा, शरद गोखले उपस्थित होते. बी.एच.एम.एस.च्या अंतिम वर्षांच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या राजबीर कौर, शिल्पा अग्रवाल आणि विमल मंगतानी या विद्यार्थिनींचा पनपालिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षणात मुली मुलांपेक्षाही पुढे जात आहेत. मात्र मुलींनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली म्हणून मुलांनी मागे राहू नये, असे पनपालिया याप्रसंगी म्हणाले.
संचालन नेहा अग्रवाल आणि जिग्ना वसानी या विद्यार्थिनींनी केले. डॉ. वाय.एस. देशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. बालपांडे, डॉ. मनमोहन राठी, उपप्राचार्य डॉ. सुनीता राठी, डॉ. गादेवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.