Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अपहरण करून बलात्कार; पाच अटकेत
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

एका पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी

 

इमामवाडा पोलिसांनी पाच आरोपींना शनिवारी अटक केली.
चिटणवीसपुरा भागातील एका पडक्या घरात शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास काही तरुण संशयास्पद स्थितीत असल्याचे एका नागरिकाने कोतवाली पोलिसांना कळवले. कोतवाली पोलीस तेथे पोहोचले तेव्हा तिघे घराबाहेर उभे असल्याचे दिसले. त्या तिघांना पकडून घरात शिरले तेव्हा तेथील दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी लगेचच त्या पाच आरोपींना व तरुणीला मेडिकल रुग्णालयात नेले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
प्राप्त माहितीनुसार या आरोपींनी एका पंधरा वर्षांच्या मुलीला ऑटो रिक्षातून त्या पडक्या घरात नेले व तेथे त्यापैकी दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. इमामवाडा हद्दीत राहणाऱ्या या मुलीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी राहुल छगनलाल सिमले (रा. भांडेप्लॉट), दीपक महादेव मेंढे, अश्वीन हिरालाल मेश्राम (दोघेही रा. सोमवारीपेठ), आकाश सुरेश खेडकर (रा. रामबाग), अमीत अंबादास शेळके (रा. गुजरवाडी) या आरोपींना अटक केली. संजू नावाचा ऑटो रिक्षाचालक फरार असून त्याचा पोलीस शोध घेतआहेत.