Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बांधकाम पूर्ण होईस्तोवरचा सेवाकर परत मागा; ग्राहक पंचायतचे आवाहन
नागपूर, १४ मार्च/ प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम पूर्ण होईस्तोवर ग्राहकाला सेवाकर पडत नसल्याने दिलेला

 

सेवाकर ग्राहकाने परत मागावा, असे आवाहन ग्राहक पंचायतने केले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकाम व्यासायिक ग्राहकाला घराचे हस्तांतरण करत असतो. तोपर्यत बिल्डर स्वत:साठी घर बांधत असतो. त्यामुळे विक्रीपत्र होण्यापूर्वी लावण्यात येणार सेवाकर बेकायदेशीर आहे. म्हणून घराचे बांधकाम पूर्ण होऊन त्याची विक्री र्केयत सेवाकर देण्यात येऊ नये. विक्रीकरार झाला असला तरीसुद्धा बिल्डरला ग्राहकाकडून सेवाकर घेता येणार नाही, असे वित्तमंत्रालयाने जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून घराची आखणी तसेच निर्मिती करून घेतली असेल आणि त्याचा स्वत: वापर करीत असलो तरी, सेवाकर द्यावा लागणार नाही. परंतु, ग्राहकाने आर्किटक्ट, डिझाईनर आदींची सेवा घेतली असल्यास त्यासाठीचा सेवाकर ग्राहकाला भरावा लागेल, असा वित्तमंत्रालयाचा पूर्वानुलक्षी निर्णय आहे. त्यामुळे बिल्डर्सनी ग्राहकांकडून सेवाकर घेतला असल्यास ग्राहकांनी त्यांच्याकडून तो परत मागावा आणि बिल्डर्सनी सुद्धा संबंधितांकडून त्याचा परतावा घ्यावा, अशी सूचना ग्राहक पंचायतच्या रामदासपेठ, कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ग्राहकांना हवी असल्यास वरील परिपत्रकाची प्रत ग्राहक पंचायतच्या कार्यालयातून स्वखर्चाने काढून घेता येईल. अन्यथा संकेतस्थळावरूनही काढून घेता येईल, असे नगरसंघटक संजय धर्माधिकारी, विदर्भ उपाध्यक्ष किरण उबाळे यांनी कळविले आहे.