Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लोखंडी प्लेट्स ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरून एक ठार, दोघे गंभीर जखमी
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

ट्रकमधील लोखंडी प्लेट्स कॅबिनमध्ये शिरल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

 

गुरुवारी मध्यरात्रीनंतर अमरावती मार्गावरील कोंढाळी येथे हा अपघात घडला.
डब्लूबी ३३ ए ५७१७ क्रमांकाचा ट्रक लोखंडी प्लेट्स घेऊन पुण्याकडे जात होता. समोरच्या ट्रकला ओव्हटेक करण्याचा प्रयत्न फसल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे बसलेल्या झटक्याने या लोखंडी प्लेट्स कॅबिनमध्ये शिरल्या. आत बसलेल्या शेख शब्बीरअली अशरफअली (रा. भोसला बाग, पश्चिम बंगाल) याचे शरीर कापत त्या थेट काचेचा भिडल्या. ट्रक चालक िपटू सादन चंद्रदास व अरमानअली नीर आरिफअली हे दोघेही त्यात फसले. अपघात झाल्याचे समजताच कोंढाळी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी लोखंडी प्लेट्स हलवण्याचा प्रयत्न केला. शेवटी क्रेन मागवून या प्लेट्स बाजूला करण्यात आल्यानंतर कुठे या दोघांना बाहेर काढता आले. हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे अमरावती मार्गावरील वाहतूक चार तास अडली होती.