Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

केअर रुग्णालयातील शिबिरात ५० रुग्णांची तपासणी
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

पंचशील चौकातील केअर रुग्णालयात जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या

 

नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ५० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
मूत्रपिंड प्रत्यारोपण व डायलेसीस या प्रकाराबद्धल आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबद्धलची माहिती याप्रसंगी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनंजय उखळकर होते. सुपर स्पेशालिटीचे मूत्रपिंड विकार विभागप्रमुख डॉ. व्ही.एल. गुप्ता, डॉ. अश्वीनकुमार खांडेकर, डॉ. शिवनारायन आचार्य, डॉ. वंदना बारस्कर, डॉ. श्रीनिवासु अचंता प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नागपूर विभागात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी एका समितीची आवश्यकता आहे. ती विभागीय स्तरावर कार्यरत असायला पाहीजे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. या शिबिरात ५० नागरिकांची तपासणी करून योग्य सल्ला देण्यात आला.
याप्रसंगी केअर रुग्णालयाचे संचालक डॉ. वरुण भार्गव, डॉ. जी.बी. मुंदडा, डॉ. एम.एम. डागा प्रामुख्याने उपस्थित होते.