Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सुनेच्या आत्महत्येप्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

रामकृष्ण नगरातील सुरेखा श्रीकांत सोनसरे हिच्या आत्महत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तिच्या

 

सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी धूळवडीला सकाळी सुरेखाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सुरेखाची सासू आरोपी लीला श्रीराम सोनसरे सुरेखाला लग्नानंतर क्षुल्लक कारणावरून मानसिक त्रास देत होती, तसेच होळीला माहेरी जाण्यासही अटकाव केल्याने सुरेखाने आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील बळीराम मोडकु वंजारी (रा. रतननगर, गाडगे लेआऊट) यांनी केली. या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी लीला सोनसरे हिच्याविरुद्ध सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.