Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

छत्तीसगडच्या व्यापाऱ्याची हॉटेलमध्ये आत्महत्या
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

व्यवसायात आलेल्या सततच्या तोटय़ाने छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील एका व्यापाऱ्याने सेंट्रल

 

अ‍ॅव्हेन्यूवरील हॉटेल सेंट्रलमध्ये आत्महत्या केली.
सुशील काशिराम मंगू (५३) असे व्यापाऱ्याचे नाव असून ते रायपूर येथील प्रियदर्शनी नगरातील रहिवासी आहेत. आज सकाळी ५.३० वाजता ते अग्रसेन चौकाशेजारील हॉटेल सेंट्रलमधील खोली क्रमांक ४४ मध्ये थांबले. दुपारी तीन वाजल्यानंतरही ते बाहेर न आल्याने हॉटेलचे कर्मचारी मधुकर कृष्णराव मारबते (४५) यांनी खिडकीत डोकावून बघितले असता त्यांना ही बाब लक्षात आली. लगेच त्यांनी ही माहिती व्यवस्थापकांना दिली.
ही माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी त्वरित मंगू यांना मेडिकलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केले. त्यांच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. व्यवसायात आलेल्या तोटय़ामुळे आत्महत्या करत असून याप्रकरणी कुणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. घटनास्थळी काहीही आढळून आलेले नाही. मात्र, ते बाहेरूनच विषारी द्रव्य प्राशन करून आले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.