Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दुचाकी टिप्परवर आदळून एक ठार, एक जखमी
मागाहून जात असलेली दुचाकी टिप्परवर आदळून दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना वर्धा मार्गावरील कोकोकोला फॅक्टरीजवळ रात्री दहा

 

वाजताच्या सुमारास घडली.
जखमीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे.वर्धा मार्गावरील मनिषनगर, पंचतारा सोसायटीमधील चरणदास काकडे(३५) हे ठार झालेल्याचे नाव असून गणेश बाबरे हा जखमी आहे. हे दोघेही खाजगी एजन्सीमध्ये चौकीदार म्हणून काम करत होते. रात्री ते कामावरून घरी परतताना हा अपघात झाला. वर्धेच्या दिशेने टिप्पर (एमएच-३१सीबी-९८००) जात होता. त्यापुढे एक ट्रक होता. या ट्रकला टिप्पर चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता परंतु, ट्रकचालकाने पुरेशी जागा न दिल्याने टिप्पर चालकाने करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे टिप्परच्या मागाहून येत असलेली दुचाकी (एमएच-३१एस-७२३७) टिप्परवर आदळली. त्यात चरणदास काकडे जागीच ठार झाला व गणेश बाबरे जखमी झाला तर, बाबरे दुचाकी चालवत होता. मागे काकडे मागे बसला होता, अशी माहिती प्रतापनगर पोलिसांनी दिली.