Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कमलकुमार मेठी अनंतात विलीन
गोंदिया, १४ मार्च / वार्ताहर

येथील ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक कमलकुमार गोविंदसहाय मेठी यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. येथील पार्वती घाट (मोक्षधाम) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार

 

करण्यात आले.
कमलकुमार मेठी यांनी पत्रकारितेची सुरुवात ‘नागपूर टाईम्स’ मधून केली. त्यानंतर ते हितवादचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. आणीबाणीच्या काळातसुद्धा त्यांनी सरकारविरोधी लिखाण केल्याने त्यांच्याविरुद्ध अटक ‘वारंट’ निघाले होते. मोक्षधामात माजी आमदार हरिहर पटेल यांच्या अध्यक्षतेत शोकसभा झाली.
नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार गोपालदास अग्रवाल, राजेंद्र जैन, डॉ. खुशाल बोपचे, राईस मिल असोसिएशन अध्यक्ष दामोदर अग्रवाल, हुकूमचंद अग्रवाल, गजानन अग्रवाल, मधुसूदन अग्रवाल आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.