Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सूर्योदय आश्रमशाळेत संविधान जागरण कुठलेही कार्य समाज सेवा म्हणून करतो- वर्षां पटेल
गोंदिया, १४ मार्च / वार्ताहर

ज्यांना विकास कामे करता येत नाही, ते केवळ टीका करण्याचे राजकारण करतात पण, समाजहित बाजूला सारले जाते. मात्र, आम्ही गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील कुठलेही विकास कार्य करताना

 

केवळ समाज सेवा म्हणून करतो, असे प्रतिपादन वर्षां पटेल यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील तांडा, तुमखेडा येथे जनसंपर्क कार्यक्रमात वर्षां पटेल बोलत होत्या. भाजप नेत्यांनी केवळ नऊ वर्षांच्या कार्यकाळात टीका करण्यापलीकडे कुठलीही विकास कामे केली नाही. प्रफुल्ल पटेल हे मात्र दोन्ही जिल्ह्य़ाच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत, असा दावा त्यांनी केला. गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास हेच ध्येय, उराशी बाळगून पुढेही कार्य करणार असल्याचे वर्षां पटेल म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत साडे चार वर्षांपूर्वी केलेली चूक मतदारांनी सुधारून विकास कामे व दूरदृष्टी ठेवणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राकाँ तालुका अध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी सभापती जगदीश बहेकर, विमल बिसेन, संजय वर्मा, नारायण भगत, पूर्णचंद चव्हान, गुणाजी कारंजेकर, गिरीधारी शेंडे, ओ.सी. पटले, डी.पी. रहांगडाले, डॉ. के.आर. पटले, नरेंद्र रहांगडाले, सरपंच रेखलाल नागपुरे, खुमेश मचाडे, सुशील कटरे उपस्थित होते. यावेळी सेवकराम राऊत, विश्वनाथ नेवारी, भरतभाऊ राऊत, पुरणलाल नेवारे, आत्माराम नेवारे, गुलाब राऊत, बिसराम राऊत यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. गोंदिया तालुक्यातील गुदमा आसोली येथेही वर्षां पटेल यांची जनसंपर्क सभा झाली. यावेळी त्यांनी मतदारांनी आधी केलेली चूक परत एकदा सुधारण्याची संधी आली असून जनतेनी जाती-धर्माच्या नावावर व भूलथापांना बळी न पडता आपली चूक सुधारावी, असे आवाहन केले.