Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वातंत्र्य संग्रामात शहीद शेडमाके विदर्भातील अग्रदूत’; चंद्रपुरातआदिवासी निर्धार मेळावा
चंद्रपूर, १४ मार्च/प्रतिनिधी

क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके हे ब्रिटिशांविरुद्ध देशात सुरू झालेल्या संग्रामातील विदर्भातील

 

अग्रदूत होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने ब्रिटिश सैन्यास जेरीस आणले होते. या क्रांतिकारकाला ब्रिटिशांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातील झाडाला फाशी दिली. या हुतात्म्याच्या स्मृतीत जिल्हा कारागृहाच्या परिसरात राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करीन, असे खासदार हंसराज अहीर यांनी सांगितले.
जिल्हा कारागृहाच्या परिसरात आदिवासी निर्धार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अहीर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दयालाल कन्नाके, वाघुजी गेडाम, तुळशीदास ताडाम, प्रमोद बोरीकर, अनिल सुरपाम, श्याम गेडाम, गणेश गेडाम, प्रकाश गेडाम, शेषराव मडावी, अशोक घाडगे, श्याम धुर्वे, अजय जिल्हावार, किशोर मसराम, डॉ. मसराम, अनंत बुजोणे, संजय दाणी, नामदेव पेंदोर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खासदार अहीर यांनी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावरील तिकीट प्रकाशन कार्यक्रमासाठी विविध आदिवासी संघटना एकत्र आल्याने या कामाला यश आले. आदिवासींच्या समस्या सोडवणुकीसाठी सर्वानी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार अहीर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी भंडारा येथील प्रा. अशोक घाडगे यांनी लिहिलेल्या बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन खासदार अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक निर्मिती व प्रकाशनासाठी मनोहर पार्डीकर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक गोंडीनृत्य सादर केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यावेळी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांच्या हस्ते कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ भोजनदान केंद्राचे उद्घाटन करून खाद्य पदार्थाचे वितरण करण्यात आले. या मेळाव्याला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्य़ातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येत हजर होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश गेडाम यांनी केले तर आभार तुळशीराम ताडाम यांनी केले. या कार्यक्रमास देवानंद गेडाम, प्रकाश सिडाम, श्रीकांत मडावी, श्याम गेडाम, किशोर मसराम, कमलेश आत्राम, क्रिष्णा मसराम, धनराज कोवे, प्रफुल्ल मडावी, भास्कर मडावी, ओमप्रकाश सिडाम, लहू मडावी, सचिन आत्राम, आनंद सिडाम उपस्थित होते.