Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आयटक’ संलग्न कामगार संघटनांचाआज मेळावा
साकोली, १४ मार्च / वार्ताहर

जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाचे धोरणांची समीक्षा करण्यासाठी आयटकशी संबंधित ट्रेड युनियन्स कार्यकर्त्यांचा मेळावा १५ मार्चला महिला संकुलात आयोजित करण्यात आला आहे.

 

या मेळाव्याला आयटकचे राज्य अध्यक्ष मनोहर देशकर, सरचिटणीस सुकुमार दामले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या सरचिटणीस हसिना गोरडे, एम.एस.ई.बी. वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस नामदेव चव्हाण, खदान कर्मचारी संघाचे महफुज आगाई आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.
या मेळाव्यात भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील आंगणवाडी ग्राम पंचायत विद्युत कर्मचारी, मोलकरीण, शेतमजूर, विडी कामगार इत्यादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा आयटकचे अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव मिलिंद गणवीर, उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, शेखर कनौजीया, देवाजी वासनिक, करुणा गणवीर, नंदा पारवे, यादवराव टेंभरे, शकुंतला फटींग, विवेक काकडे, एम.आर. लोखंडे, किशोर येल्ले यांनी केले आहे.