Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सानंदांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची शेतकऱ्यांनी केली होळी
बुलढाणा, १४ मार्च / प्रतिनिधी

सावकार सानंदाने हडपलेल्या जमिनी परत मिळवून देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी सावकारच्या ताब्यातील शेतातच काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा व माजी

 

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
दृष्टप्रवृत्ती दहन करण्याची परंपरा होळीच्या निमित्ताने चालत आलेली आहे. सावकारीच्या दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली. सरकारने सावकारच्या मुसक्या बांधून शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या नाहीत तर वेळप्रसंगी आम्ही कायदा हाती घेण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला. वैरागड येथील शेतकरी मुरलीधर तोंडे यांची १५ एकर जमीन सावकाराने हडपली आहे. या जमिनी परत मिळाव्यात या मागणीकरिता सानंदा व माजी मुख्यमंत्री देशमुख यांच्या पुतळ्याचे होळीत दहन करून शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.