Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

डेबुजी सखी मंचचा स्नेहमिलन मेळावा
चंद्रपूर, १४ मार्च/प्रतिनिधी

डेबुजी सखी मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खजांची भवन येथे धोबी समाजातील महिलांचा स्नेहमिलन मेळावा नुकताच पार पडला. या वेळी महिलांच्या विविध स्पर्धाही पार

 

पडल्या. या स्पर्धेत महिलांनी उत्साहात भाग घेतला .
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. नूतन धवने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी लीलावती पालनवार होत्या.
या स्नेहमिलन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उमा चव्हाण, निर्मला लेवटकर उपस्थित होत्या. महिलांनी दैनंदिन जीवनात स्वत:च्या कलागुणांच्या विकासाकरिता सातत्य कायम ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे निर्मला लेवटकर यांनी सांगितले.
महिलांनी आत्मनिर्भर होऊन सामाजिक व आर्थिक प्रगती करावी ,असे आवाहन लीलावती पालनवार यांनी या कार्यक्रमात बोलताना महिलांना केले. या वेळी झालेल्या विविध स्पर्धेकरिता परीक्षक मीना रामटेके, कांचन आहुजा, सुनंदा चौधरी, सुमन कोलगंटीवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले .
रांगोळी स्पर्धेत प्रथम रिना खंडाळकर, द्वितीय निर्मला लेवटकर तर तृतीय सविता भोस्कर, उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम वनिता भिलकर, द्वितीय भारती शिंदे, तृतीय माया मल्लेलवार क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
नृत्य स्पध्रेत प्रथम आभा भिलकर, द्वितीय केतकी मल्लेलवार, तृतीय अंजली गुंडावार यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नंदीनी चुनारकर, अस्मिता मल्लेलवार तर आभार वनिता भिवलकर यांनी मानले. या कार्यक्रमास जयश्री राऊत, सविता भोस्कर, भारती शिंदे, छाया क्षीरसागर, गीता चिंचोळकर उपस्थित होत्या. या वेळी गीता सेलोकर, गीता उंबरकर, प्रतिभा लोणारे, सरिता पदमेकर, नीता चौधरी, राजकन्या रामेकर, माया पिंपळकर, ज्योती काजळकर, चतुरकर उपस्थित होत्या.