Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खामगावातील अतिक्रमणे हटवली
खामगाव, १४ मार्च / वार्ताहर

शहरातील शेगाव नाक्यापासून ते जलंब नाक्यापर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण

 

धारकांना अतिक्रमण हटवण्यासंबंधी नोटीस देऊन, गेल्या ४-५ दिवसात सूचनाही देण्यात आल्या. त्यानुषंगाने अनेकांनी अतिक्रमण स्वत:हून हटवले. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्याची शेवटची मुदत दिली त्यामुळे अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे हटवली.
दुचाकीसह ४१ हजारांचा माल जप्त
विना परवाना दारूची वाहतूक करताना आढळून आलेल्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दुचाकीसह ४१ हजारांचा माल लंपास केला आहे. अभय नगरातील सचिन महादेव हुरपडे व नरेंद्र दौलतसिंग ठाकूर हे दोघे बजाज दुकाची क्र. एमएच२८/१९३७ ने दारू घेऊन जात होते. पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांना अटक करून दारू व दुचाकी जप्त केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.