Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

लसणीची तिखट चटणी, खजुराची गोड चटणी, कांदा, तळलेली हिरवी मिरची आणि गरमागरम खुसखुशीत वडा! तोंडाला पाणी सुटणारा हा मेनू म्हणजे तमाम मुंबईची ओळखच. रस्त्यावरच्या गरीबापासून ते श्रीमंतांच्या स्टार हॉटेल्सपर्यंत समाजातील सर्व घटकांना आवडणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. आजही अनेक मुंबईकरांसाठी वडापाव हाच पोटाचा मुख्य आधार आहे. या वडापाववरच अनेक जीव तगले आहेत आणि अनेकांनी मजाही मारली आहे. सचिन तेंडुलकरपासून ते थेट स्लमडॉगला जागतिक स्तरावर नेणाऱ्या डॅनी बॉयलपर्यंत साऱ्यांनाच या वडापावने वेड लावले आहे. आणि आता तर शिववडय़ाच्या निमित्ताने वडापावची दुसरी राजकीय इनिंगदेखील सुरू होऊ घातली आहे..

साटम वडेवाले -(सीटीओचा वडापाव)
मनोहर साटम यांनी ३६ वर्षांपूर्वी सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमधील नोकरी सांभाळून हुतात्मा चौकात वडापावची गाडी सुरू केली. वडापावचा व्यवसाय करण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू होता तो म्हणजे आपल्या मुलांनी नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करावा आणि तो पुढे चालवावा.आज अशोक, अजय आणि अल्हाद या त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांची इच्छा आपलं कर्तव्य मानून हा व्यवसाय यशस्वीरीत्या पुढे सुरू ठेवला आहे.
अशोक आणि अजय साटम या दोघांनी हा व्यवसाय उभा केला.

खिडकी वडा (कल्याण) अमिता वझे
‘‘आमच्या वडय़ाची चव हीच आमची ओळख. आमच्याकडून जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत असतो,’’ कल्याणच्या वझेबंधूंचा ‘खिडकी वडा’च्या
प्रमुख अमिता वझे सांगत होत्या. गेली ४० वर्षे वझेबंधूंचा वडापावचा व्यवसाय कल्याणात आहे. अमिता वझे यांच्या सासू-सासऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केला. घरातल्या खिडकीतून ते वडे विकायचे.

सेलिब्रेटी आणि वडापाव
महाराष्ट्राचा, खास करून मुंबईचा ‘वडापाव’ हा पारंपरिक आणि विशेष लोकप्रिय खाद्यपदार्थ. प्रत्येक घरात खाल्ला जाणारा हा पदार्थ सिनेसृष्टीतील कलाकारांनाही अगदी मनापासून खायला आवडतो. मराठी सिनेसृष्टीतील अशाच काही वडापाव आवडणाऱ्या कलाकारांशी यशश्री उपासनी यांनी केलेली ही बातचीत.
प्रशांत दामले
सिद्धार्थ कॉलेजला असताना, स्टॉक एक्स्चेंजमध्ये ते काम करायचे. तेव्हा सकाळचं कॉलेज करून लंच ब्रेकमध्ये त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे फ्लोरा फाऊंटन येथील वडापाव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि खवय्येगिरीने लोकप्रिय असलेले अभिनेते प्रशांत दामले यांचाही वडापाव हा अतिशय आवडता खाद्यपदार्थ आहे. त्या वेळेला ते जवळजवळ सात-आठ वडापाव आरामात खायचे. यावरून त्यांना वडापाव किती आवडतो हे लक्षात येतं. शिवाय ते स्वत:ही उत्तम वडापाव बनवितात आणि सगळ्यांना तो आवडीने खायला घालतात. त्यांच्यासाठी वडापाव म्हणजे स्वर्गीय आनंद!
नीलम शिर्के

ये दुनिया अगर मिल भी जाये..!
जगण्याची, जीवनाची आणि समाजाची काळी बाजू लेखक, दिग्दर्शक अनुराग कश्यपला बहुधा सतत खुणावत असावी. त्याने लिहिलेले ‘सत्या’, ‘शूल’ हे चित्रपट, सामान्य माणसाच्या नजरेआड घडणारे क्रौर्य- नाटय़ दाखविणारे होते. त्याने दिग्दर्शित केलेले ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘देव-डी’ हे सुद्धा एका परीने कुरूपतेचेच दर्शन घडविणारे अनुभव होते. अनुरागचा ‘गुलाल’ हा नवा चित्रपटही याच वाटेचा प्रवासी आहे. स्थळ, व्यक्तिरेखांची नावे बदलतात, रक्तपाताचे हेतू बदलतात, क्रौर्य तेच राहते.

‘आम्हीच जिंकणार!’
स्वार्थी किडीची पोखरण

आंब्याच्या अढीला एक जरी कीड लागली तरी सबंध अढीच नासून जाते, तशीच घरालाही एकदा का कीड लागली, की भक्कम घरही पोखरायला वेळ लागत नाही. कृष्णकांत (ऊर्फ कांता) गुप्ते आणि केतकी गुप्ते यांचं अभि या तरुण मुलासहचं काडी काडी जमवून उभारलेलं घर त्यांची प्रेमविवाह करून घरात आलेली सून मीता आपल्या स्वार्थाध कृत्यांनी उद्ध्वस्त करू पाहते. परंतु केतकी कणखरतेनं तिला तिच्याच भाषेत उत्तर देऊन तिला आयुष्यभराचा धडा शिकविते. ‘आम्हीच जिंकणार!’ या प्र. ल. मयेकर लिखित आणि मंदार शिंदे दिग्दर्शित नाटकाचा हा थोडक्यात गाभा! आज व्यक्तिवादानं गाठलेलं टोक कुठल्या थराला गेलं आहे, याचं दर्शन या नाटकात घडतं. वरकरणी पारंपरिक सासू-सून संघर्षांचं हे नाटक प्रारंभी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी या नोटवर सुरू होतं.

ललित कलेच्या दिशेने..
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा एक मुलगा ललित कलेच्या दिशेने जाणाऱ्या छायाचित्रणामध्ये अर्थात फाईन आर्ट फोटोग्राफीमध्ये माहीर होईल, असे कुणी २० वर्षांपूर्वी सांगितले असते तर कुणाचाही त्यावर विश्वास बसणे तसे कठीणच होते. पण आज ती वस्तुस्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपन्तचे रहिवासी असलेले सी. आर. शेलारे आज विविध प्रकारच्या छायाचित्रणात तर यशस्वी आहेतच पण त्याचबरोबर त्यांचा प्रवास आता फाईन आर्टच्या दिशेने सुरू झाला आहे. आता ते केवळ छायाचित्रकार राहिलेले नाहीत तर त्यांचा प्रवास आता ललित कलावंताच्या (फाईन आर्टिस्ट) दिशेने सुरू झाल्याच्या पाऊलखुणा त्यांच्या मुंबईतील पहिल्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. त्यांचे हे मुंबईतील पहिलेवहिले प्रदर्शन १७ मार्चपासून वरळीच्या नेहरू केंद्रातील कलादालनात सुरू झाले आहे.