Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण विभागाची झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हनवर मात
कटक, १४ मार्च / पीटीआय

डळमळीत सुरुवातीनंतर अर्जुन यादव व रवीचंद्रन अश्विन यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर

 

दक्षिण विभागाने झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हनचा तीन गडी राखून पराभव केला आणि देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत बोनस गुणांसह विजय मिळवला.
काल पश्चिम विभागाविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दक्षिण विभागाने आज पाहुण्या झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हनचा डाव ४९.५षटकात १९३ धावात गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. संक्षिप्त धावफलक - झिम्बाव्बे अध्यक्ष इलेव्हन ४९.५ षटकात सर्वबाद १९३ (मस्काड्झा १५, चिभाभा २७, मत्सिकेनरी ३६, मुतिझव्हा ४०, क्रेमेर १९, आर. प्राईस २६; शोएब २-२७, अरविंद २-५०, योमहेश १-१८, अश्विन २-३०, बद्रीनाथ १-१७) पराभूत विरुद्ध दक्षिण विभाग (एस. अनिरुद्ध ३२, अर्जुन यादव ७१, आर. अश्विन नाबाद ५०; रेन्सफोर्ड १-३७, चिगुम्बुरा १-५०, मस्काड्झा २-१३, चिभाभा १-१५, क्रेमेर ३-३१).
जग्गीचे शतक; पूर्व विभाग विजयी
देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत इशांक जग्गीने(११०) झळकावलेले नाबाद शतक आणि धीरज गोस्वामीचा अचूक मारा याच्या जोरावर पूर्व विभागाने उत्तर विभागाचा ६५ धावांनी पराभव केला. बोनस गुणांसह विजय मिळवणाऱ्या पूर्व विभागाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा दावा मजबूत केला आहे. आजच्या पराभवामुळे उत्तर विभागाचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. जग्गीच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्व विभागाने ६ बाद ३०५ धावांची दमदार मजल मारली आणि प्रतिस्पर्धी उत्तर विभागाचा डाव ४९.४ षटकात २४० धावात गुंडाळला. आसामचा मध्यमगती गोलंदाज धीरज गोस्वामीने ३५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी मिळवत पूर्व विभागाच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. उत्तर विभागाचा कर्णधार मिथून मन्हास (५८) आणि सलामीवीर आकाश चोप्रा (५८) यांनी अर्धशतके झळकावली पण, संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. उत्तर विभागाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा विराट कोहली केवळ ७ धावा काढून माघारी परतला.