Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

पाणी, शिक्षण, आरोग्य या सार्वजनिक सुविधा जपल्या नाहीत तर गरिबांना जगता येणार नाही. गावांना आधुनिक करण्याचे शिवधनुष्य आपल्याला उचलता येईल का त्याच्या वजनाने आपण कोलमडून जाऊ, यावर आपले भविष्य ठरणार आहे. तोपर्यंत आपणच घाण करून ठेवलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार आणि नाहक बळी ही आरोग्याची किंमत चुकवावी लागेल. पेलाभर शुद्ध पाणी, द्याल का कुणी? ‘तपश्चर्येकरिता पवित्र व सुरक्षित जागा कोणती?’ अशी विचारणा याज्ञवल्क्यांकडे काही ऋषींनी केली. ‘मनोमय चक्रातून असे ठिकाण तयार करतो. त्या चक्राची धाव जिथे पडेल ती जागा निवडा’ असा सल्ला याज्ञवल्क्य ऋषींनी दिला, अशी आख्यायिका आहे. अवघ्या भारतामध्ये हवा, पाणी व अन्न शुद्ध असणारे स्थान दाखवा, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अथवा साक्षात परमेश्वराने (आपापल्या श्रद्धेनुसार) केल्यास थेट नकार देण्याऐवजी असेच उत्तर मिळेल.

गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या अवघड विषयातच नव्हे तर सृष्टिशास्त्र, पंचांग शुद्धीकरण आणि हवामानशास्त्रातही पारंगत असणाऱ्या केरोनाना छत्रे यांची १२५ वी जयंती येत्या १९ मार्चला येते आहे. त्यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’ केरोनानांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा हा लेख त्या निमित्ताने.. १९व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक विनायक लक्ष्मण ऊर्फ केरोनाना छत्रे यांचं नाव घेणं भाग आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे गुरू असलेल्या केरोनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरोनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली.

पाकिस्तानच अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी अखेरीस नमते घेतले, पण तसे करताना त्यांनी आपला मूळ रंग दाखवला आणि ‘जिओ टी. व्ही.’चा गळा आवळला. पाकिस्तानच्या राजकारणावर त्याचेही बरेच परिणाम होऊ शकतात. झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जो सुप्त संघर्ष सुरू होता, त्यात गिलानी यांचे पद जायची शक्यता होती, तूर्त त्यांचे ते संकट टळले आहे. लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी हे गिलानींच्या बाजूला आहेत, हे स्पष्ट झाल्याने झरदारींना यापुढे एखाद्या सम्राटाप्रमाणे वागून चालणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम पाहावे लागेल. पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ पुन्हा दिली जात असल्याने तूर्त तरी पेचप्रसंग मिटला, असे दिसत असले तरी झरदारींच्या मागे फिरण्याने नवा पेचप्रसंग पुन्हा कधीही उद्भवू शकतो. अध्यक्ष कमकुवत आहेत, हाही समज बळावू शकतो. पंजाबसारखे मोठे राज्य पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या पूर्ण अमलाखाली जाऊ नये, या उद्देशाने कयानी यांनी या सर्व संकट काळात गिलानी यांना पाठबळ दिले. गिलानी हे कदाचित अधिक शक्तिशाली नेते ठरू शकतात; पण कयानींचा राजकीय कवायतीचा हा सराव त्यांना भविष्यात उपयुक्त ठरू शकतो. पाकिस्तानी राजकारण्यांनी काळजी घ्यावी, असा मात्र हा भाग आहे.

मार्क्‍सवादी बाण्याचे प्रखर राजकीय तत्त्वज्ञ आणि भाष्यकार असलेले कॉ. प्रभाकर संझगिरी यांनी सोमवारी वयाच्या ८७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी आणि त्या पक्षाचे मुखपत्र ‘जीवनमार्ग’चे संपादक या नात्याने कॉ. संझगिरी यांनी महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळीतील कच्च्या दुव्यांवर नेमके बोट ठेवले. याची प्रचिती सदर लेखासोबत प्रसिद्ध करीत असलेल्या त्यांच्या मनोगतातूनही येते. तरुण कार्यकर्त्यांमध्ये असलेली प्रबोधनाची भूक भागविताना, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची उकल करताना त्यांनी उत्तम शिक्षकाचीही भूमिका बजावली. कामगार चळवळ हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असले तरी झोपडपट्टी, भाडेकरू चळवळ, सांस्कृतिक चळवळीतही त्यांनी उमदे कार्यकर्ते घडविले. विद्यार्थी जीवनात सर्व परीक्षा उत्तम गुणवत्तेसह उत्तीर्ण करणाऱ्या कॉ. संझगिरी यांची शैक्षणिक यशाची ही परंपरा त्यांची नात किमया हिने बारावीत मुंबई बोर्डात पहिली येऊन कायम ठेवली.