Leading International Marathi News Daily
सोमवार, १६ मार्च २००९

मोटरवाला
यशोगाथा

आम्ही काही मित्र १९३५ च्या मॉरिस-८ मोटरमधून फेरफटका मारीत होतो. मोटर घोडबंदर रोडवरून धावत होती. रोडवरून धावणाऱ्या विविध मॉडेलच्या मोटारींमध्ये स्कोडा, कोर्सा मोटारीही होत्या. पण लोक मॉरिस-८ कडे पाहत होते. निमुळती लाल रंगाची, छताला काळी ताडपत्री असलेली ती मोटर पाहताच प्रेमात पडावी अशी. आणि आम्ही तर चक्क स्वप्नवत वाटणाऱ्या त्या मोटरमधून प्रवास करीत होते. मोटरचे सारथ्य करीत होते संजीव वसंतराव मेस्त्री. त्याच वेळी ते मोटरची विशेषत: सांगत होते. याचे खास टायर्स वा एखादा पार्टही आयात करावा लागतो. मॉरिस-८ च्या प्रेमात पडल्यावर हेही करावं लागतं, असं संजीव मेस्त्री हसत हसत सांगत होते. शिवाय ज्यांच्याकडे १९५६-१९६३ च्या दोन फियाट मोटरही आहेत. दोन्हींचे रंगढंग वेगळे वाटले. सोबतीला रोजच्या वापरातील स्कोडा, कोर्सा या मोटारीही आहेतच. असे हे संजीव मेस्त्री म्हणजे मोटरमय झालेले मोटरवाला आहेत.
नाहीतरी अभिजात व्यक्ती आपल्या कर्माने-कामानेच अधिक ओळखले जातात. आता हेच बघा ना काचवाला, बाटलीवाला, लोखंडवाला, टायरवाला अशी व्यवसायरूप नावे आहेत ना! मग एखादा मराठी माणूस मोटरवाला म्हणून पुढे येत असेल, धावत असेल, जगाभोवती फिरत असेल तर त्यांना जग जिंकू द्या ना! अशा या धावपट्टीवरचे संजीव मेस्त्री ‘सानवा मोटर्स प्रा. लि.’ अशा कंपनीसदृश मोटर वर्कशॉपचे कार्यकारी संचालक आहेत. अगदी जगरहाटीच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ते मोठय़ा गॅरेजचे मालक

 

आहेत. सध्या तरी देशात वर्षांला २० लाख मोटर्स तयार होतात. त्यातले अध्र्या निर्यात झाल्या तरी अध्र्याअधिक
मोटारी भारतीय रस्त्यावरून वाहणार आहेत. मग मोटर वर्कशॉपना मागणी वाढणार. त्यातून मेस्त्री
ज्या ठाण्याच्या मानपाडा, टेंबीनाका, पोखरण भागात राहतात, फिरतात तिथेच २० हजार मोटर्स आहेत. शिवाय खुद्द मेस्त्री ज्या सोसायटीत राहतात तिथे २०० फ्लॅट आहेत आणि मोटर्स आहेत ३५० पर्यंत. तेव्हा आता बोला मोटर्स वर्कशॉपची किती तरी गरज आहे.
अशा सव्‍‌र्हेच्या अभ्यासातून संजीव मेस्त्रींनी सानवा मोटर्सची स्थापना केली आणि आत्मविश्वासाचा होरा खरा ठरला. मानपाडय़ातील त्यांचे वर्कशॉपच मुळी १८००० चौ. फुटांचे मोकळे, स्वच्छ, शिस्तबद्ध आहे. तिथे जणू मल्टिकारचे नीटनेटके प्रदर्शनच भरले आहे असे वाटते. कळके, मळके, धुरकट, तेलाच्या वासाने भरलेले, अस्तव्यस्त गराज या आपल्या जाणिवांना छेद देणारी सानवा मोटर वर्कशॉप म्हणजे एक प्रकारे मोटर उद्यान भासते. वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक अवजारे, उपकरणे आहेत. तीसएक ऑटो कारागिरांचा जथा आहे. अगदी संजीव मेस्त्रीपासून ते सगळे कारागीर एका पोशाखात जणू ‘हम सब एक है.. दिल से’ असे तिथे काम चालते. आणि अनेक कारणांनी मोटरची बिघडलेली प्रकृती सावनामध्ये ठीक होऊन परत आपल्या रस्त्याला लागते. जणू संजीव मेस्त्री संचालित ‘सानवा मोटर डायग्नॉस्टिक सेंटर’ आहे, असे त्याचे स्वरूप वाटते. आणि का वाटू नये, कारण खुद्द मेस्त्रीच मोटरशी बोलतात, संवाद साधतात. म्हणजे मोटरच्या आवाजावरून त्यातला बिघाड ओळखतात. जणू रोग्यांची नाडी बघून त्यांच्या रोगांचे निदान करतात. साधारणपणे ३५ तांत्रिक चाचण्या चार विभागांतून तपासल्या जातात. एकाच वेळी तिथे २५ मोटरचे काम चालू असते. त्यासाठी हेल्पलाइनही आहे.
संजीव मेस्त्री यांच्या मल्टी कार वर्कशॉपचे एवढेच वैशिष्टय़ नसून अलीकडेच त्यांच्या सानवा मोटर्स व मोबिल-१ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-ठाणे येथील पहिलेच मोबिल-१ कार केअर आऊटलेट सुरू केलेले आहे. मोबिल-१ म्हणजे जगातील कारचे नंबर १ इंजिन ऑईल म्हणून ओळखले जाते. या ऑईलमुळे मोटर अधिक काळ टिकते, चालविण्यात हलकेपणा वाटतो. रेसिंगमध्ये याच ऑईलचा वापर होतो. याचे चार प्रकार असून त्यांच्या किमती चढत्या प्रमाणावर आहेत. मोबिल-वन ऑईल वापरणारा मोटरचा मालक-चालक म्हणजे एक प्रकारे जगात ‘स्टेटस सिंबॉल’ समजला जातो, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे वाटू नये.
म्हणजे स्वत:चा शोध घेणारा उद्योजक बदलत्या जगाचा वेध घेत स्वत:ही बदलत असतो. असेच काहीतरी संजीव मेस्त्री आपल्या सावना मोटर वर्कशॉपमध्ये बदल करीत असतात. आता हेच बघा ना त्यांचे आजोबा म्हणजे ८० वर्षांपूर्वी विरारजवळील बोळिंजमध्ये नंबर वनचे डायमेकर होते. इंजिनचे पार्टस् बनविण्यात मातबर होते. वडिलांनी वकिली पेशा पत्करला तरी ते मनाने तंत्रज्ञानी होते. एकूणच काय संजीव मेस्त्री तांत्रिक संस्कारानी मंतरलेले होते. १९८३ ला मेकॅनिकल पदविका घेऊन आपल्या परंपरेप्रमाणे तेही इंजिन पार्टस् कामात गुंतले आणि मागणीप्रमाणे मुंबई, पुणे, बारामती ते एम.पी.च्या पिथमपूर येथे त्यांनी उद्योग घटक उभारले. ते आप्तमित्रांना चालविण्यास दिले, कारण त्यांचे मन नावीन्याच्या शोधात होते, जिथे रमता येईल अशा कामाच्या ते शोधात होते. गंमत म्हणजे ते रमते जग त्यांच्या जवळच होते. या वेळी मला यश बिर्लाचे एक वाक्य आठवते.
I keep watching myself. अशा आत्मचिंतनातूनच मेस्त्री मोटर वर्कशॉपच्या सेवा उद्योगाकडे वळले.
संजीव मेस्त्रीची अगदी लहानपणापासूनची आवड म्हणजे विविध प्रकारच्या मॉडेलच्या मोटर्स पाहणे, त्यांचे तंत्रज्ञान समजून घेणे, ती मोटर चालविणे, त्यातून फेरफटका मारणे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी वर्षां त्यांनाही हे भावते. मधूनमधून त्याही आपला घरसंसार सांभाळून स्कोडा मोटर चालवीत ‘सानवा’मध्ये येतात. वर्कशॉप, वक्तशीर, शिस्तशीर, स्वच्छ, चकाचक आहे की नाही ते पाहतात. मुळी ‘वर्कशॉप’चे सानवा हे नाव संजीव व वर्षां या नावातून घेतले आहे. एकूण मोटरचे विस्तारित जग व आवड एकत्र असल्याने सानवा मोटर मार्गावर आली. धावू लागली.
संजीव मेस्त्री वर्कशॉपचे एम.डी. असूनही त्या खुर्चीत बसलेले दिसत नाहीत. मेस्त्री नावाप्रमाणे इतर कारागिरांबरोबर काम करताना दिसतात. यातून त्यांचे व्यवस्थापनातील मानवीकरण दिसते. कारागिरांच्या सुखदु:खाकडे त्यांचे लक्ष असते. तसेच सामाजिक भानही ते राखून असतात. मोटर सुरू करण्यापूर्वी तेल, पाणी, ब्रेक पाहावे हे मोटर चालकाला समजावून सांगतात. ‘रोड’ सेफ्टी ड्रायव्हिंग सप्ताहात जातीने भाग घेतात. त्यावर शिक्षण, प्रशिक्षण असावे असे त्यांचे प्रयत्न असतात. मोटर वर्कशॉपचे काम जसे श्रमाचे आहे तसे ते बुद्धिचातुर्याचेही आहे. या कामात शक्ती आणि युक्तीचा चांगला उपयोग होतो असे संजीव मेस्त्री मानतात. जिथे शक्ती आणि युक्ती नांदतात तिथे लोकोत्तर कामे वाढतात, तशा सानवा मोटरच्या शाखा वाढोत, या आमच्या शुभेच्छा.
’ भीमाशंकर कठारे
संपर्क : ९८६९०४११११, ०२२-२५८४१५५५