Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

शेतीवाडी

बांध-बंदिस्तीने जमीन पिकाऊ
म हाराष्ट्रामध्ये ७० ते ८० टक्के कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र आहे. कोरडवाहू जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात पावसाचा लहरीपणा खूपच वाढला आहे. मृग नक्षत्रात पाऊस येत नाही. पुढीलही नक्षत्र कोरडेच जातात. म्हणजे योग्यवेळी पाऊस पडत नाही. आलाच तर सर्वत्र येत नाही. खूप येईल किंवा कमी येईल. तसेच पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येते व अनिश्चितता वाढते. म्हणून पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवता आला पाहिजे. याचा विचार प्रत्येक शेतकरी बांधवांनी करणे आवश्यक आहे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप (झिज) होते.

वेलीद्वारे रताळे लागवड
बटाटा किंवा रताळे ही पिके आपल्याकडे भाजी किंवा उपवासासाठी वापरतात. पण काही देशांमध्ये रताळ्याचे पीक प्रमुख अन्न म्हणून गणले जाते. बटाटय़ाचे किंवा उसाचे बेणे लागते. तशी रताळ्याची पारंपरिक लागवडही कंदाच्या आधारे केली जाते. अनेक पिकांवर संशोधन चालू असताना आता रताळ्याची लागवड कंदाशिवाय व वेलीचे तुकडे लावूनही करता येते, असे संशोधन पुढे आले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रम्ॉपीकल अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेने ही संशोधित पद्धती विकसित केली आहे. खरे तर असे प्रयोगच नव्याने दिशा देणारे ठरणार आहेत.

कृषी विज्ञान केंद्राचा प्रयोग परिवार
प्रगत शेतीमध्ये नवनवीन पिकांचे दर्जेदार व भरपूर उत्पादन, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची खात्री, पीक काढणीनंतरचे तंत्रज्ञान व मालाचे आकर्षक पॅकिंग, बाजारभाव आणि मागणी पाहून मालाचा पुरवठा, शेतीत प्रक्रिया उद्योग, शेतीविषयक सल्ला-मार्गदर्शन, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर उपक्रम वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयत्नातून आणि फार्मस क्लब, बचत गटाच्या माध्यमातून हेच कार्य प्रभावीपणे होऊ शकते. अहमदनगर जिल्ह्य़ातील बाभळेश्वर (ता. राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्राने गेल्या १२-१३ वर्षांत या दृष्टीने केलेले कार्य निश्चितच स्पृहणीय, तितकेच अनुकरणीयही आहे.

घातक तणांची आयात
जा गतिकीकरणातून संपूर्ण जग जवळ आले आहे, हे खरे. पण त्याबरोबर जगातील विविध भागातील काही अनिष्ट बाबीही येत आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परस्परांशी सहकार्यातून जागतिक भूकमुक्तीकडे वाटचाल करण्याचे सर्वाचे ध्येय आहे. पृथ्वीवरील प्रत्येक भागात वेगवेगळी नैसर्गिक वैशिष्टय़े आहेत. ही वैशिष्टय़े त्या-त्या परिसरातील भौगोलिक स्थिती व वातावरणाशी संबंधित असतात. जगभर सर्वत्रे कोठेही जा, तेथे तुम्हाला अन्न-धान्याची पिके जशी दिसतील, तसे त्या पिकांना मारक ठरणारे अनावश्यक गवत किंवा तणही दिसेल. जेथे पिके, तेथे तण आहेच. रासायनिक खतांच्या वापरानंतर अशा तणांना अधिक जोर येतो. कोणतेही तण नैसर्गिक नियमानुसार लागवड केलेल्या पिकापेक्षा जोमाने वाढते. पिकाचे व आजूबाजूचे अन्न शोषून घेण्याची त्याची ताकद जास्त असते. त्यावर उपाय म्हणून रासायनिक औषधेही काढली गेली आहेत.

‘सोन्याची अंडी’ देणारा इमू!
ख रं तर, इमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी. अमेरिकेत त्याला लिव्हिंग डायनॅसोर असं म्हटलं जातं. इमूचं वेगळेपण म्हणजे त्याची उंची माणसाच्या उंचीएवढी म्हणजे साडेपाच फुटांपर्यंत वाढते. आणि तो जगतोही तब्बल ४० वर्षांपर्यंत. तो तसा रफटफच. -१० अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस अशा आत्यंतिक टोकाच्या हवामानातही इमू आरामात राहतो. इमू जन्माला आल्यापासून ते तीन वर्षांचा होईस्तोवरचा काळ त्याच्या बाल्यावस्थेचा काळ म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या वर्षांनंतर तो प्रौढ होतो. तिसऱ्या वर्षी त्याच्यापासून १० ते १५ अंडय़ांचे उत्पादन मिळते. नंतर हळूहळू अंडय़ांची संख्या वाढत जाते आणि ४० पर्यंत पोहोचते. वर्षांतील सहा महिने इमूकडून अंडय़ांचे हे उत्पादन मिळते. इमू २५ वर्षांचा झाल्यानंतर अंडय़ाचे उत्पादन थांबते.

 

Dear Sir,
This is Mandar Gadage,from UK. I am doing my Masters in Agribusiness Management. I did B.Tech in Agri.from Dr.P.D.K.V,Akola.I appricite your article .You have presented very good data in your article on 16 th feb.2009 (Kharach, sarkarach magaslele). I think there must be link between Agri. Uni. and Farmers, also there is an immediate need to focus on processing industry. Here in UK the Govt of UK considers Agri. as a one of the business sector, so there planning and its implementations of
strategy is driven by business point of view. Many farmers in India do farming for their bread and butter. I do agree with them, but some farmers need to change their attitude and they should treat agri. as a business and should
pressurise Govt. to implement some initiatives regarding
processing and programmes like Horticulture high-ways as you mentioned. In the coming years Processing industry may play vital role in the farmers life in India..I don’t have exact statistics about processing industry, but I hope this industry will definately can increase farmers income.