Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
व्यापार - उद्योग

‘रिलायन्स मार्ट’चेही मुंबईत आगमन
व्यापार प्रतिनिधी:
रिलायन्स रिटेलने आपल्या हायपरमार्केटचे ब्रॅण्ड ‘रिलायन्स मार्ट’साठी आपला होरा अखेर देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडे वळविला. तिरुपती, पुणे, गुरगाव, फरिदाबाद, बंगलोर, रांची, हैदराबाद, जोधपूर तसेच गुजरातमध्ये अहमदाबाद आणि जामनगर या शहरांतील ‘रिलायन्स मार्ट’ची दालने यशस्वीपणे सादर केल्यानंतर मुंबईनजीक ठाणे येथे ‘रिलायन्स मार्ट’ ग्राहक सेवेत रुजू झाले आहे. ठाणे शहरात अशर मॉल, पोखरण मार्ग क्र. २, ठाणे (प.) येथे उभारलेल्या या भव्य दालनात ग्राहकांना मनसोक्त खरेदीचा आनंद घेता येईल.

आयसीआरआयच्या वतीने
‘आयडिया इण्टरॅक्टिव्ह व्हाइट बोर्ड सिस्टीम’

व्यापार प्रतिनिधी:
इन्स्टिटय़ूट ऑफ क्लिनिकल रिसर्च इंडिया (आयसीआरआय) या ‘क्लिनिकल रिसर्च’मधील अग्रेसर संस्थेने ‘आयडिया इण्टरॅक्टिव्ह व्हाइट बोर्ड सिस्टीम’ ही क्रांतिकारक प्रशिक्षण पद्धती सुरू केली आहे. नवीन प्रकारची प्रशिक्षण पद्धती सुरू करणाऱ्या भारतातील मोजक्या इन्स्टिटय़ूटपैकी ही एक होय. ‘आयसीआरआय’च्या नवीन बॅचमधील मुलांकरिता ही प्रशिक्षणपद्धती सुरू करण्यात येणार आहे. या पद्धतीची संभाव्यता तपासण्यासाठी एक प्रमुख प्रकल्प हाती घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘एन-पॉवर’चा डिजिटल कम्युनिकेशन क्षेत्रात बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम
व्यापार प्रतिनिधी:
जागतिक पातळीवर लर्निग सोल्यूशन पुरवण्यात अग्रगण्य, अ‍ॅपटेक लिमिटेडच्या ‘एन-पॉवर’ या हार्डवेअर व नेटवर्किंग प्रशिक्षण विभागाने तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठासोबत सहकार्य करार केला आहे. या करारानुसार ‘हार्डवेअर नेटवर्किंग आणि डिजिटल कम्युनिकेशन’ हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व ‘हार्डवेअर आणि नेटवर्किंग’ हा एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. बारावी (१०+२) इयत्ता किंवा त्या पातळीची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे. तसेच सुरुवातीस पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देण्याची खास सोयसुद्धा प्रवेश प्रक्रियेत करण्यात आली आहे. पदविकाधारकांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र त्यासठी त्यांना या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही अभ्यासक्रमासाठी फेब्रुवारी व जुलै अशी वर्षांतून दोन वेळा प्रवेश प्रकिया सुरू ठेवण्यात येणार आहे.

‘आरकॉम’तर्फे ‘नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’
व्यापार प्रतिनिधी:
रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडने (आरकॉम) ‘रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’ ही भारतातील सर्वाधिक वेगवान सीडीएमए वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस सेवेचा डाऊनलोड स्पीड ३.१ एमबीपीएस (मेगा बाईट पर सेकंद) असून स्वतंत्र अपलिंक स्पीड १.८ एमबीपीएसपर्यंत आहे. याचाच अर्थ इतर कोणत्याही वायरलेस ब्रॉडबँड सेवेच्या तुलनेत नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लसचा डाऊनलिंक दर ३० टक्क्यांनी अधिक आहे, त्यामुळे ही सेवा व्हीडीओ स्ट्रीमिंग, व्हीडीओ सव्‍‌र्हेलन्स, भरपूर माध्यम आशय व उत्कृष्ट इंटरनेट ब्राऊझिंगसाठी अत्यंत योग्य ठरणार आहे. या सेवेसाठीचे मासिक शुल्क २९९ रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जेवढा वापर तेवढे शुल्क (पे ऑन यूज) पद्धतीपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळते. लवकरच महिन्याला ४९९ रुपये शुल्काची अनलिमिटेड नाईट प्लॅन ही योजनाही सादर केली जाणार आहे. या वायरलेस ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून देशभरातील दीड कोटी इंटरनेट ग्राहकांपर्यंत (६० लाख लॅपटॉपधारक, १० लाख १ एक्स सीडीएमए डाटाकार्ड वापरणारे व ८० लाख घरगुती संगणक वापरकर्ते) पोहोचण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे.

थॉमस कूकचे खास ‘न्यूझीलंड हॉलिडे पॅकेज’
व्यापार प्रतिनिधी:
साहसी चित्तवृत्ती आणि मनोरम निसर्गसौंदर्यासाठी ज्गप्रसिद्ध असणाऱ्या न्यूझीलंडमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही राखलेलं आहे. कृत्रिम गोष्टींची अजिबात गर्दी नसलेल्या या देशामध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य, अस्पर्श समुद्रकिनारे, लाव्हाची चपळाई, आल्हाददायक हवामान आणि समृद्ध वन्यजीवन अशा अनेक अविस्मरणीय गोष्टी आहेत. त्यामुळे जगातल्या या सर्वात तरुण देशामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला समाधानाचे सुखाचे अनेक क्षण अवचित सापडतील. न्यूझीलंडच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी सेल्फ-ड्रायव्हिंग हॉलिडेज हा उत्तम पर्याय आहे. जगभरातल्या इतर कुठल्यही देशात सेल्फ-ड्रायव्हिंग हॉलिडेजचा इतका उत्तम अनुभव येत नाही, असं खुद्द इथे येणाऱ्या पर्यटकांचंच मत आहे. या देशातल्या कुठल्याही भागात जा, तिथे ट्रॅफिक कमी तर असतंच, पण निसर्गाने जागोजागी सौंदर्याची उधळणही केलेली दिसते. मग वाट कसली पाहताय? निसर्गरम्य न्यूझीलंडचा आनंद लुटा. थॉमस कुकचं सेल्फ-ड्राइव्ह हॉलिडे पॅकेज ६ रात्री आणि ७ दिवसांचे असून प्रत्येकी ६९९९० रु. अशी त्याची किंमत आहे.

‘ओरायन कॉलटेक’च्या पुण्यातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन
व्यापार प्रतिनिधी:
ओरायन कॉलटेक ही ओरायन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बीपीओ प्रशिक्षण विभाग असून, पुण्यातील फग्र्युसन रस्त्यावरील त्याच्या पहिल्या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना बीपीओ उद्योगातील कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करावे या उद्देशाने २००५ मध्ये ओरायन कॉलटेकची स्थापना करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान-आधारित सेवा (आयटी-एनेबल्ड सव्‍‌र्हिसेस) उद्योगाकडून ओरायन कॉलटेकला मान्यता आणि स्वीकृती मिळाली असून या उद्योगाचा विश्वास असलेली आणि प्रक्रियापूर्व प्रशिक्षण संस्था आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जा, लवचिकपणा आणि मूल्ये हे ओरायन कॉलटेकच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मानदंड आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला देणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. संस्थेचे शुल्क रास्त असून, त्यात वैयक्तिक प्रशिक्षणाबरोबरच विशेष अभ्यास सामग्री, रोजगार मदत सेवा आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. ओरायन कॉलटेक ही देशातील आयएसओ ९००१:२००० प्रमाणपत्र मिळवणाऱ्या संस्थापैकी एक असून, त्यात संस्थेच्या प्रमाणपत्राबरोबरच ब्रिटनमधील सिटी अ‍ॅण्ड गिल्डसकडूनही प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता असून, त्याला जगभरातून बीपीओ उद्योगाकडून स्वीकृती आहे. ओरायन कॉलटेकचे उपाध्यक्ष आलोक रॉय म्हणाले. ‘‘सध्याच्या आव्हानात्मक जगात केवळ बेरोजगारीला शाप देत बसू नये. त्याऐवजी रोजगाराची आशा आपण जागवूया. कॉलटेकमध्ये आमचे लक्ष्य तेच आहे.’’

एप्रिलपासून एअर अरेबियाची गोव्यातूनही विमानसेवा
व्यापार प्रतिनिधी:
मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिकेतील पहिली व सर्वात मोठी किफायतशीर दर विमान सेवा कंपनी एअर अरेबियाने आज गोव्यासाठी सुरू करीत असल्याची घोषणा केली. यूएई ते गोवा ही विमानसेवा १६ एप्रिल २००९ पासून सुरू केली जाणार आहे. डॅबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गोवा व एअर अरेबियाचे मुख्य केंद्र शारजा अशी ही विमान फेरी आठवडय़ातून तीन वेळा उपलब्ध असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीपासून गोव्याकरिता थेट विमानसेवा सुरू करणारी यूएईतील एकमेव विमानसेवा कंपनी बनण्याचा मान एअर अरेबियाला मिळेल. मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी एअर अरेबियाची विमाने गोव्याच्या दिशेने उडतील. शारजाहून रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटणारे विमान गोव्याला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल व परतीच्या फेरीचे विमान पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी गोव्याहून निघून शारजाला सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

उत्तर भारतात ‘मेटलाइफ’ची नवीन २० कार्यालये
व्यापार प्रतिनिधी :
आपल्या देशव्यापी विस्तार योजनेचा भाग म्हणून मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (मेटलाइफ) या भारतातील झपाटय़ाने वृद्धी पावणाऱ्या आयुर्विमा कंपनीने उत्तर भारतामध्ये २० नवीन कार्यालयांचा शुभारंभ करीत असल्याची घोषणा केली आहे. या शाखा कपूरथळा, जालंदर, सांगरूर, बरनाळा, भटिंडा, पांचकुला, फरिदकोट, पठाणकोट, होशियारपूर, मोहाली, लुधियाना, अमृतसर प्रीत विहार, द्वारका, उदयपूर, जोधपूर, अजमेर, गुरगाँव, नॉयडा आणि मेरठ येथे असणार आहेत. या माध्यमातून उत्तर भारतातील ४० शहरांमध्ये मेटलाइफच्या ५८ शाखांचे जाळे प्रस्थापित झाले आहे.

‘कॉटनकिंग’ची मुंबईसह राज्यभरात १८ शोरूम्स
व्यापार प्रतिनिधी:
शुद्ध कॉटनच्या रेडिमेड ब्रॅण्ड असलेल्या ‘कॉटनकिंग’ने महाराष्ट्रात १७ ठिकाणी आपली शोरूम्स उघडली आहेत. पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, लातूरबरोबर डोंबिवली, बोरिवली नंतर ‘कॉटनकिंग’ची शोरूम्स मुंबईच्या मध्यवर्ती भागात सुरू होत आहेत. ‘कॉटनकिंग’ने आपली १८ वी शाखा गिरगाव येथे अलीकडेच सुरू केली. बाबूभाई जगजीवनदास व ‘कॉटनकिंग’ या दोघांमुळे एक आगळेच वलय गिरगाव शाखेला लाभले आहे. ‘कॉटनकिंग’च्या या गिरगाव शाखेचे उद्घाटन हर्षद गोरडिया यांच्या हस्ते व मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ‘कॉटनकिंग’ म्हणजे १०० टक्के कॉटन मुंबईच्या हवामानाला अत्यंत सूट करणारे आहे. कॉटनचा सुखद स्पर्श, परवडणारी किंमत, रोजच्या वापराला कम्फर्टेबल असणारे आणि तरीही ब्रॅण्डेड रेडिमेड्स अशी स्वतंत्र ओळख ‘कॉटनकिंग’ने निर्माण केली आहे.