Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षकाने २२ चोऱ्या केल्याचे तपासात उघड
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

 

आमराईत फिरण्यासाठी आलेल्या महिलेच्या मोटारसायकल डिकीतून रोकड व मोबाईल लंपास करणाऱ्या रामचंद्र बुळरगी या शिक्षकाने तब्बल २२ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याकडून १५ मोबाईल, सोन्याचे दागिने, कॅमेरा असा दीड लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
गेल्या आठवडय़ात आमराईत मुलाला घेऊन आलेल्या अंजली नितीन उपाध्ये या महिलेच्या डिकीतून १७ हजार रुपयांची रोकड व मोबाईल संच चोरीस गेला होता.
या प्रकरणी पोलिसांनी हरिपूर येथील रामचंद्र बुळरगी या शिक्षकाला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वी असे अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
रामचंद्र बुळरगी हा गेल्या काही वर्षांपासून पडद्याआड गुन्हे करीत असून त्याने विश्रामबाग येथील गणपती मंदिर व आमराईत हे गुन्हे केले आहेत.
त्याने चोरलेले तब्बल सोळा मोबाईल संच त्याच्या घरात पोलिसांना मिळून आले. सोन्याचे दागिने त्याने पोतदार नामक एका सराफाला विकले असून, या सराफालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सराफाला आरोपी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी विशेष पथकाला दिले आहेत.