Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विकृती थोपविण्यासाठी लैंगिक शिक्षण उपयुक्त - येळेगावकर
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी

 

लैंगिक शिक्षण हे शरीरशास्त्र किंवा संभोगशास्त्र नसून एड्स, गुप्तरोग, बलात्कार, लैंगिक शोषण, विवाहपूर्व व विवाहबाह्य़ संबंध, विवाहपूर्व मातृत्व, एकतर्फी प्रेमातून होणारे छळ, हत्या आणि भोगवादी संस्कृतीमुळे वाढत चाललेली लैंगिक विकृती थोपविण्यास उपयुक्त ठरू शकते, असे मत डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर महापालिका आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या वतीने आयोजित केलेल्या किशोरींसाठी लैंगिक शिक्षण प्रबोधन शिबिरात डॉ. येळेगावकर बोलत होते. महापालिकेच्या कुटुंब कल्याण संकलन केंद्रामार्फत शाळेत न जाणाऱ्या किशोरवयीन मुलींकरिता हे प्रबोधन शिबिर आयोजिले होते.
या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी ‘पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदल’ यावर मार्गदर्शन केले. कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. जयंती आडके यांचे भाषण झाले. यावेळी डॉ. ए. एम. सय्यद, सौ. पी. व्ही. घोंगडे, सौ. आर. डी. साठे, सविता होनराव, सौ. एम. टी. जाधव, सौ. एस. आर. पारशेट्टी, सुशांत कुलकर्णी, एच. पी. पाल आदी उपस्थित होते.