Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

थिंक क्वेस्ट २००९
मुंबईत तंत्रज्ञानविषयक फेस्टिव्हल्स, स्पर्धा मोठय़ा प्रमाणात आयोजित केल्या जातात तरी या सर्व फेस्टिव्हल्स, स्पर्धामध्ये ‘थिंक क्वेस्ट’ ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळी आहे. बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘थिंक क्वेस्ट’ या स्पर्धेत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या विद्यार्थ्यांना आपले प्रकल्प सादर करायची संधी मिळते. गेल्या आठ वर्षांपासून या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व पॉलिटेक्निक कॉलेजेस सहभागी होतात.

मतदान आणि तरुण मतदार..
व्होट फॉर चेंज, यूथ फॉर चेंज. प्रत्येक निवडणुकीचे एक वैशिष्टय़ असते. देशातील यंदाच्या निवडणुकांना यापेक्षा वेगळी घोषणा असूच शकत नाही. यंग आणि व्हायब्रंट ही फॅशन जगतातील संकल्पना आता राजकारणातही रूढ होतेय. नव्या पिढीचे नवे बी स्कूलवाले चेहरे ही नवी संकल्पना घेऊन राजकारणात येत आहेत. अनुभवी, मुरब्बी, मुत्सद्दी राजकारण्यांच्या थोराडपणापुढे आपला ताजातवाना उत्साहाने सळसळता आणि आशावादी चेहरा घेऊन या निवडणुकीत उमेदवार आणि मतदार पुन्हा एकदा उतरले आहेत.

..आणि रिसर्चचा ‘पल्स’ रेट वाढला
आयआयटी, मुंबई (आयआयटीबी) या नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत होणाऱ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाला ‘पल्स’च्या माध्यमातून स्वत:ची नस सापडली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण ‘पल्स’ द्विवार्षिक मालिकाद्वारे आयआयटीबीत होणाऱ्या रिसर्च अँड डेव्हलपर्सची योग्य माहिती मिळणार आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला असलेले अतिशय महत्त्व आणि तरीही विद्यार्थ्यांची संशोधनाबद्दलची मरगळ या गोष्टी ‘पल्स’च्या निर्मितीस कारणीभूत ठरल्या. प्रतीक राज, तिलक पटनायक आणि, आदिल शाह हे तीन आयआयटीयन्स ‘पल्स’चे संपादक म्हणून काम पाहतात.

दिल से..
प्रिय सावनी,

Congrats dear, great job. खरं तर इतकं काही सॉलिड काम तू केलेलं नाही आहेस, पण तरीही. आणि मी मागच्या वर्षी जेव्हा माझं नाव मतदार यादीत येण्यासाठी फॉर्म भरला होता तेव्हाच तुला सांगितलं होतं पण तेव्हा तू कंटाळा केलास आणि आता रडतेयस, Lets hope तुझं नाव मतदार यादीत येईल आणि तू योग्य उमेदवाराला मतदान करशील. तू म्हणालीस ते सर्व बरोबर आहे. गडबड, गोंधळ, कन्फ्यूजन, गर्दी हे सर्व वर्षांनुर्वष असंच चालत आलेलं आहे आणि म्हणूनच मतदार या प्रोसेसला कंटाळतो. भारतीय संविधानाप्रमाणे वोटिंग हा आपला हक्क असूनही त्यासाठी एवढय़ा किचकट प्रोसेसमधून जावं लागत असेल आणि त्यानंतरही मतदार यादीत नाव येण्याची शाश्वती नसेल तर लोकशाहीच्या या अधिकाराला कोण किंमत देणार.

मीडियाटेन्मेंट २००९
शैक्षणिक वर्ष संपत आले की वेळ येते ती विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामांची म्हणजेच प्रकल्प संशोधन, अभ्यास या सर्वाचे मूल्यमापन करण्याची, त्यांच्या चाचणीची, ठरलेल्या पद्धतीनुसार चाचणी घेण्यापेक्षा प्रदर्शन स्वरूपात या चाचण्या घेतल्या तर? वेगळीच मजा असेल ना!
पाटकर कॉलेजमध्ये गेल्याच आठवडय़ात ‘मीडियाटेन्मेंट २००९’ हे प्रदर्शन पार पडलं. बीएमएम शाखेच्या तिन्ही वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तयार केलेले मीडिया प्रोडक्ट्स या प्रदर्शनात मांडलेले होते. त्याचे तज्ञांकडून मूल्यांकनसुद्धा झाले. शिवाय डॉक्युमेंट्री, पोस्टरमेकिंग, अ‍ॅडमेकिंग, फोटोग्राफी या विभागांतील विजेत्यांची नावेही घोषित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे असून आजच्या स्पर्धात्मक युगात आपण नक्की कुठे आहोत ते विद्यार्थ्यांना कळेल आणि याचा भविष्यात त्यांना फायदा होईल असं मत यावेळी पाटकर कॉलेजमधील बीएमएम समन्वयक प्रा. सुरेंद्र तन्ना यांनी व्यक्त केले.
वरद लघाटे,पाटकर महाविद्यालय
varadlaghate@rediffmail.com

मीट द गर्ल बिहाइंड लाफ्टर कॅप्सूल
लाफ्टर कॅप्सूलमधील आकर्षक इलेस्ट्रेशनमागे गीता चव्हाणचा ‘हात’ असतो. सोफिया पॉलिटेक्निकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक महोत्सवात तिच्या कॅलिग्राफी, कॅलेंडर आणि स्केचेस या तीन कलाप्रकारांना अनुक्रमे ‘बेस्ट एक्झिबिट’ आणि बेस्ट ड्रॉइंग’ ही पारितोषिके मिळाली. कॅम्पस मूड टीमने तिच्या एकूण आर्टगिरीबद्दल तिच्याशी मारलेल्या मुलाखतवजा गप्पातून उद्याच्या स्टार हटके आर्टिस्टची झलक दिसली.
तुझ्या वैविध्यपूर्ण कलाकृतींबाबत नेमकं काय सांगशील?
स्पॉन्टॅनिटी.. बस्स! एखादा विषय मिळाल्यावर त्याविषयी पहिल्यांदा जे काही सुचतं त्यावर आपलं काम ठरतं. एकदा का काय करायचं ते पक्कं ठरलं की, टूल्स, कागद आणि डोकं यांचा बॅलन्स राखत ते काम पूर्ण करायचं. माझ्या कॅलेंडरकरिता सेल्फग्रोथ हा विषय होता, म्हणून त्याविषयी जसं सुचलं ते मी मांडलं.
कला माध्यमाविषयी तुझं मत काय? तू कलेकडे कसं पाहते?
प्रत्येक कलाकृतीत वेगळा विचार केलेला असतो आणि तसा तो करायचा असतो. माझ्याविषयी म्हणाल तर माझ्याकडून किती उत्तम काम होईल, मी किती मनापासून ते करतेय हे महत्त्वाचं असतं.
तुझ्या मते कलेविषयी सर्वाना माहिती असावी का?
नक्कीच. एक आर्टिस्ट म्हणून माझं काम पाहताना लोकांना निश्चितच त्याबद्दल माहीत असणं, त्या मागचा विचार कळणं महत्त्वाचं आहे. शिवाय प्रत्येकाची व्यक्त करण्याची स्टाइल वेगळी असते. एखादा कलाकार त्याला जे सुचतं, पटतं त्याप्रमाणे काम करतो, त्यामुळे लोकांनी दिलेल्या मतानंतर तो स्वत:च्या कामात, शैलीत बदल करूच शकत नाही. जी कलाकृती झाली ती झाली आणि म्हणूनच लोकांनी पाहताना निश्चित विचार घेऊनच कला पहावी.
जगण्याविषयीचा तुझा अ‍ॅप्रोच काय आहे?
मला जे पटतं, सुचतं, आवडतं ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या कलाकृतीमागेसुद्धा हाच विचार असतो.

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमें हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.