Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
भावताल

हवामान बदलले, आपण बदलणार?
काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी एका लेखातून जगाला प्रश्न विचारला होता- The Climate is Changing can we? (हवामान बदलतंय, आपण बदलू शकतो का?) या आधीच खरं तर या बदलाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात झाली होती. ‘क्योटो प्रोटोकॉल’ हे त्यातलं राजकीय, आर्थिक व वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचं पाऊल होतं. (किमान महत्त्वाचं ठरावं असं तरी वाटत होतं!) याबरोबरच वैयक्तिक पातळीवर आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे हेदेखील तितकंच महत्त्वाचे पाऊल मानले गेले. उदाहरणार्थ घरात पारंपरिक बल्बऐवजी सीएफएल (कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लँप) चा वापर करणे. या लेखात आपण या दोन पातळ्यांवरच्या पावलांचा आणि त्यामधल्या नात्याचा विचार करू या.

जगभर प्लास्टिक
प्रत्येक शहरात आता मॉल वाढीला लागले आहेत. तिथे पिनपासून ते फर्निचपर्यंत सर्व काही मिळतं. मॉलमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातातल्या कॅरी बॅगचं पुढं काय होतं? हा संशोधनाचाच विषय आहे. आता मॉलमध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने सामानाबरोबर कॅरी बॅगही ओघानेच घरी येतात. या बॅग आपण निसर्गात फेकल्या जाण्यापासून कशा रोखू शकतो? जगभरात कॅरी बॅग व त्यांचे वर्गीकरण, पुनर्वापराविषयी लहान-मोठय़ा चळवळी सुरू आहेत. अमेरिकेत काही हौशी पर्यावरणप्रेमींनी मॉल्समधून मिळणाऱ्या कॅरीबॅग कमीत कमी कशा होतील, घरी सामानामुळे येणाऱ्या बॅग परत-परत कशा वापरल्या जातील आणि वापरून झाल्यावर रिसायकलिंग स्टेशनपर्यंत कशा पाठवल्या जातील, या संदर्भात छोटे-छोटे क्लबच स्थापन केले आहेत.

ते सारे गेले कुठे?
आपल्या परिसरातील पर्यावरणाचे प्रश्न- समस्या या अनेक माणसांना दिसत नाहीत, जाणवतही नाहीत आणि पर्यावरणरक्षणात सामान्य माणसाचा सहभाग काय, सहभाग देण्यास सामान्य माणसाजवळ वेळ आहे कुठे? कारण सामान्य माणूस आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यातच दंग आहे. आपल्या परिसरात काही बदल झाला आहे, याचे त्याला काहीच भान राहिलेले नाही. आमच्या लहानपणी खूप झाडी-जंगल होते, हे प्रत्येक आई-वडील आपल्या मुला-मुलींना सांगायचे. पण हे नष्ट कसे झाले? हे मात्र सांगायचे नाही. आम्ही गावी गेल्यावर आजोबांना विचारायचो की हा माड, ताडाचे झाड किती वर्षांपासून आहे? तेव्हा आजोबा म्हणायचे तो ताड, माड माझ्या आजोबांनी लावला होता.

उसाचे ‘पडीक क्षेत्र’
साखर उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग म्हणून सवश्रुत असून यामध्ये सहकार क्षेत्राचा वाटा सुमारे नव्वद टक्के इतका आहे. साखर उद्योगाचे पश्चिम महाराष्ट्र हे माहेरघर असून सहकार क्षेत्राचे माध्यमातून हा परिसर सुजलाम-सुफलाम झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये राबविलेल्या वैविध्यपूर्ण संकल्पनामुळे जनसामान्यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव मोहिते पाटील आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे सहकार चळवळीचे प्रणेते व उद्गाते गणले जातात. सोलापूर जिल्हा हा सध्या सहकार क्षेत्राची राजधानी म्हणून गणला जात असून मोहिते-पाटील परिवाराने या परिसराचा केलेला कायापालट हा समस्त भारत देशासमोर एक आदर्शवत मॉडेल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या भागातील ऊस पिकाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होत आहे.