Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रशांत दामले सांगणार कॉलेजविश्वातील ‘धमाल’
चिंचवडला ‘आम्ही संघवीकर’ मेळावा
िपपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

चिंचवडच्या संघवी केसरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा रविवारी (२२ मार्च) स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असून या वेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेला अभिनेता

 

प्रशांत दामले कॉलेजविश्वातील धमाल सांगणार आहे.
चिंचवड येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता हा मेळावा सुरू होणार आहे. यामध्ये कृतज्ञता िदडी, वर्ग व फळापूजन, अभिरूप वर्ग, हास्य कविसंमेलन, मित्र परिवारातील स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉलेज कट्टय़ावरील गप्पा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या मेळाव्यात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व शाखांमधील माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सिने कलावंत प्रशांत दामले हे काही काळासाठी संघवी केसरी महाविद्यालयात होते. यापूर्वी झालेल्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहणाऱ्या प्रशांतने याही वेळी हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे. त्या काळातील गमतीजमती प्रशांत सर्वाना सांगणार आहे.
मेळाव्याचे निमंत्रक गजानन चिंचवडे यांनी याबाबतची माहिती दिली. मेळाव्यात दोन हजार माजी विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मेळाव्याच्या आयोजनामागे माजी विद्यार्थ्यांच्या मुलांना आर्थिकदृष्टय़ा मदत करणे, माजी विद्यार्थ्यांची रक्तगट सूची तसेच स्मरणिका तयार करणे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सुसंवाद घडवून आणणे आदी उद्देश असल्याचे चिंचवडे यांनी सांगितले.