Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पिंपरीतील कुख्यात गुन्हेगाराचा गळा आवळून खून
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

िपपरीतील मुख्य बाजारपेठेत आज सकाळी एका गर्दुल्या कुख्यात गुंडाचा गळा आवळून खून

 

करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली.
पिंपरी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष ऊर्फ चिच्या सुभाष टाक (वय ३०, रा. सुभाषनगर, पिंपरी) असे खून झालेल्या कुख्यात गर्दुल्याचे नाव आहे. चिच्याला गेल्या २५ ऑगस्टपासून पुणे जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले होते. चिच्याला सििरजद्वारे ड्रग्स घेण्याचे व्यसन होते. तो तडीपारीच्या कालावधीत शहरात आढळून आल्याची कारवाई काही दिवसांपूर्वीच पिंपरी पोलिसांनी केली होती. आज सकाळी पिंपरी बाजारातील गुरू नानक मार्केट इमारतीमध्ये बंद असलेल्या गाळ्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तेथील एका कामगारास दिसले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती वाऱ्यासारखी पिंपरी परिसरात पसरली. सुभाषनगर मधील काही लोकांनी त्या मृतदेहातील व्यक्तीला ओळखले. पोलिसांना तो तडीपार झालेला चिच्याच असल्याचे समजले.
पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद सुर्वे, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याच्या नाकातून व हाताच्या दोन बोटांमधून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने प्रथम ड्रग्सच्या अति सेवनांने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय निरीक्षक सुर्वे यांनी व्यक्त केला होता. घटनास्थळी पोलिसांना ड्रग्सच्या पुष्कळ सििरज मिळून आल्या आहेत. ठसे व वैद्यानिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून रक्ताचे व सििरजचे नमुने गोळा केले. डॉक्टरांच्या निर्णयावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
चिच्यावर जबरी चोरी, मारामारी, घरफोडी, चोरी, दरोडय़ाच्या तयारीचे गुन्हे नोंद आहेत. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद सुर्वे करीत आहेत.