Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निष्क्रियता हेच समाजाच्या अध:पतनाचे मुख्य कारण - बंडातात्या कराडकर
हिमानी सावरकर यांना हिंदूुकुल पुरस्कार
िपपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

समाजामध्ये वाढत चाललेली निष्क्रियता हेच समाजाच्या अध:पतनाचे मुख्य कारण आहे, असे मत

 

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काळेवाडी येथे बोलताना व्यक्त केले.
प्रवाहाच्या विरोधात जाऊन पोहण्याची जिद्द जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत सुधारणा होणार नाही, असेही ते म्हणाले.
हिंदूू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिमानी सावरकर यांना हिंदूुकुलभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. काळेवाडी येथील एम. एम. विद्यामंदिराच्या प्रांगणात शिवजयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, उद्योजक रमणलाल लुंकड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बाबर, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेवक श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक कुमार जाधव, राजाभाऊ गोलांडे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
कराडकर म्हणाले की, हिंदूुत्ववादी विचारांचा देशभर प्रसार करणाऱ्या हिमानीताईंचे काम कौतुकास्पद आहे. सद्यस्थितीत हिंदूू समाज डोळे मिटून बसला आहे. आपण निष्क्रिय होत चाललो आहोत. कमी काळात जास्त पैसे मिळावेत, अशीच अपेक्षा दिसून येते. थोडक्यात काय तर समाजात निष्क्रियता वाढत चालली आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजन पंडित धर्मवीर आर्य, कैलास बारणे, उत्तम दंडिमे, सुहास पोफळे आदींनी केले.
‘‘डाऊ’नंतर इंद्रायणी-भीमा शुध्दीकरणासाठी लढा’
‘डाऊ’ कंपनीच्या विरोधात वारकऱ्यांनी उभारलेला लढा यशस्वी झाल्याचे सांगत बंडातात्या कराडकर यांनी आता इंद्रायणी आणि भीमा नदीच्या शुध्दीकरणासाठी लढा उभारणार असल्याचे यावेळी सांगितले. इंद्रायणी नदीचे गटार झाले असून त्याचे पाणी तीर्थ म्हणून आम्ही पितो, याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.