Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलमधील पन्नास विद्यार्थिनींचा ‘गाथा ज्ञानाची’ मध्ये सहभाग
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

लोकसत्ता आणि महाराष्ट्र नियंत्रण महामंडळ आयोजित गाथा ज्ञानाची या कात्रण संकलन

 

उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कॅम्प हायस्कूलचे उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर नारायण दिघे तसेच पर्यवेक्षिका ए. बी. शिंदे, उपशिक्षिका पाटील या वेळी उपस्थित होत्या.
विद्यालयातील ५० विद्यार्थिनींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सर्व विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किरण गायकवाड या विद्यार्थिनीस स्कूल बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जैनम पानसरे हिस तृतीय क्रमांकासाठी मोबाईल संच देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून दिघे म्हणाले की, भूक असेल तर पोट भरून जेवण करावे. म्हणजे एखादी गोष्ट करताना ती गोष्ट पूर्ण जोमाने व ताकदीने पार पाडण्यास प्रयत्न करावे. गाथेसारख्या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेऊन ज्ञान संपादन केले पाहिजे.
कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्याबद्दल उपमुख्याध्यापक दिघे तसेच पर्यवेक्षिका ए. बी. शिंदे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.