Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भावनेपेक्षा कर्तृत्व मोठे- सिंधुताई सपकाळ
लोणावळा, १६ मार्च /वार्ताहर

देशाचे ऋण फेडण्याकरिता महिलांनी भावनिक बनण्याऐवजी सोशिक बनायला शिका. भावनेपेक्षा कर्तृत्व केव्हाही मोठे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची आई सिंधुताई सपकाळ

 

यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा शहर पोलीस स्टेशन व महिला सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित ‘आईच्या काळजातून’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. पद्मिनी कराड यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ‘चंद्रलोक’ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजिका रेणुका कोटक, सामाजिक कार्यकर्त्यां शैलजा फासे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत माने, पो. नि. सुदाम दरेकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी वर्षां बहन आदी मान्यवर उपस्थित
होते.
या वेळी बोलताना सपकाळ यांनी आपली कर्तव्य, बांधिलकी, संस्कृती, परंपरा महान असल्याचे सांगत कायद्याचा आधार घेत त्यांचा गैरवापर न करता महिलांनी मनावर सुसंस्कार घडवत अंतरिम विकास साधावा, असा सल्ला महिलांना दिला. आई घराचे मांगल्य, तर बाप घराचे अस्तित्व असल्याने या दोघांनीही बांधिलकी जपावी, असे सांगत महिलांना नम्र व्हायला शिका, असे आवाहन सपकाळ यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. नीलिमा खिरे यांनी, तर सूत्रसंचालन भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत यमुना साळवी, उषा बोरास्कर, अर्चना कुलकर्णी यांनी केले.