Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मरकडादेव तीर्थक्षेत्राचा विकास दुर्लक्षितपणामुळे ठप्प
गडचिरोली, १६ मार्च/ वार्ताहर

चामोर्शी तालुक्यातील मरकडादेव येथील विकास कामे मागील १० वर्षांपासून प्रलंबित आहेत.

 

या पवित्र तीर्थस्थळावरील ही कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी जिल्ह्य़ातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्कडादेव येथे झालेल्या बैठकीत केले.
या प्रलंबित मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मरकडादेव येथील पायऱ्यांचे बांधकाम, खासदार निधीतील नदीकाठावर, निवारा यात्रा परिसर व नदीघाटाचे सौंदर्यीकरण, इत्यादी कामे रखडलेली आहेत. मरकडादेव येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम निधीअभावी बंद आहे. ते सुरू करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा, साखरी- लोंढोली रस्त्याचे कामही कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
या कामात अनियमितता झाली असून काही अधिकारी बदलून गेलेत तर काही निलंबित झालेत; परंतु कामे प्रलंबित आहेत. ही विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
या निवेदनावर गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विश्वनाथ कुंभारे माजी आमदार हिरामण वरखेडे, समय्या पासुला, स्वातंत्र्य संग्राम सैनिक खिनखिनकर, भ्रष्टाचार विरोधी जन-आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भंडागे, भाजपचे सरचिटणीस रमेश भुरसे, किसनराव गिरडकर, गजानन भांडेकर, गंगाधर कोडूकवार, मृत्युंजय गायकवाड, प्रकाश कापकर, रामेश्वर काबरा, पांडुरंग पांडे, नामदेव सोरखे, नामदेव काळबांधे, पंडितराव पुडके, सुखदेव वेढे, सुरेश मांडवगडे, नकटुजी राऊत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.