Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जनता शिक्षण महाविद्यालयाला ‘हायर लर्निग अँड रिसर्च’ केंद्राचा दर्जा
चंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

जनता शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे नुकतीच ‘प्लेस

 

फॉर हायर लर्निग अँड रिसर्च’ म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण शाखेतील असा दर्जा मिळविणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. जनता शिक्षण महाविद्यालय हे ‘नॅक बी प्लस’ दर्जा प्राप्त असून उच्च अध्ययन आणि संशोधनासाठी आवश्यक असणारे निकष जसे भौतिक सोईसुविधा, उच्च दर्जाचे ग्रंथालय, संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठ मान्यताप्राप्त अनुभवी ‘पीएच.डी.’ मार्गदर्शक, संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती याची पूर्तता करणारे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनता शिक्षण महाविद्यालयात एम.एड्.बी.एड्. डी.एड्. अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संशोधन कार्य अविरतपणे सुरू आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण शाखेशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांवर संशोधन कार्य सुरू आहे. बऱ्याच संशोधन प्रबंधांना विद्यापीठाने मान्यताही दिली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर पेपर्स वेळोवेळी सादर केले आहे. व संबंधितांनी त्याची प्रशंसाही केली आहे.
महाविद्यालयाला ‘हायर लर्निग अँड रिसर्च केंद्र म्हणून मान्यता मिळावी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा जनता शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक एस. जीवतोडे यांचे मार्गदर्शन लाभले.