Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रगती महाविद्यालयात महिला दिन सप्ताह
भंडारा, १६ मार्च / वार्ताहर

प्रगती महिला कला महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहांतर्गत ‘स्तन कर्क रोगावर’ मार्गदर्शन शिबीर व ‘उत्कर्ष’ वार्षिकांकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

 

प्रगती महिला समाजाच्या संचालिका शालिनी देशकर होत्या.
महिलांच्या आरोग्याकरिता जिल्ह्य़ात कार्यरत ‘सपोर्ट ग्रुप’च्या प्रमुख माधुरी तिजारे, श्रीकांत तिजारे आणि श्वेता देशपांडे यांनी स्तनकर्क रोगाची लक्षणे, कारणे, घ्यावयाची काळजी, करावयाच्या तपासण्या, किमोथेरपी, रेडिएशन, मेमोग्राफी याबद्दल महिती दिली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनी व महिलांसोबत प्रश्नोत्तर चर्चा झाली.
महाविद्यालयाच्या ‘उत्कर्ष’ वार्षिकांक २००८-०९चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. सावनेरच्या हरिभाऊ आदमने कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. भास्कर नंदनवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ‘ज्यांनी लेखनाला प्रारंभ केला त्यांनी लेखणी थांबवू नये, नवनवे अनुभव घेत, लेखनाला धार कशी येईल, याचा अविरत प्रयत्न करावा’ असा संदेश प्रा. नंदनवार यांनी दिला. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी करून दिला. संचालन शिल्पा ठवकर यांनी केले. आभार अर्चना सेलोकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष सुशीला वानखेडे, प्रा.डॉ. एम.पी. सूजी, प्रा. जयश्री सातोकर, प्रा. विजया लिमसे, प्रा. कल्पना निंबार्ते, प्रा. जी.एन. कळंबे, प्रा. डी.डी. चौधरी, डॉ. कुंभारे आदी उपस्थित होते.