Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

- उत्तरार्ध -
मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध आय.टी. कंपनीत उमेदवारी करण्याची संधी तरुण होतकरू पदवीधरांना तांत्रिक आणि बिगरतांत्रिक दोन्ही क्षेत्रात उपलब्ध आहेत. तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारी आणि पात्रतेबद्दल गेल्या सदरात आपण माहिती मिळविली. आता काही बिगरतांत्रिक क्षेत्रातील इंटर्नशिप संधींबद्दल पाहूया.
मनुष्यबळ विकास विभाग इंटर्नशिप- मायक्रोसॉफ्टने मनुष्यबळ विकासासंदर्भात आपला ‘एचआर ट्रॅक्स’ हा स्वतंत्र व वेगवान कार्यक्रम आखला असून यासाठी जगभरातून विविध विद्यापीठांतून पूर्ण वेळ इंटर्न्‍सना घेतले जात आहे. या जगद्व्यापी विस्तार असलेल्या आस्थापनेत काही काळ काम करणे हेही समृद्ध अनुभव गाठीशी बांधण्यासारखेच आहे. ट्रॅक्स विभागातील इंटर्न्‍सना विशिष्ट व्यवसाय विभागात, जगाच्या विशिष्ट भूगोलात किंवा कार्यक्षेत्रात एचआर बिझनेस पार्टनर म्हणून जबाबदारी
 

सोपविली जाते आमि त्यांना आपले नाविन्यपूर्ण मनुष्यबळ विकासाचे धोरण किंवा योजना राबविण्याची संधीही दिली जाते. मोबदल्यांचे विश्लेषण, कन्सल्टंटच्या कार्यकक्षांचे नियोजन ज्यात विविध विषयातील तज्ज्ञांची तात्पुरत्या तत्त्वावर विशेष मोबदल्यावर सेवा उपभोगणे, संघटनेच्या विकसनात प्रक्रिया अंमलबजावणी, संशोधन, वारसाविषयक नियोजन, टॅलेन्ट प्लॅनिंग, कर्मचाऱ्यांचे चलनवलन आणि वैविध्य वगैरे जबाबदाऱ्याही या ट्रॅक्स इंटर्न्‍सच्या कार्यकक्षेत येतात.
या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांकडे बीएस/बीए, एमबीए किंवा एचआर संलग्न विषयात एमए यापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता, सशक्त व्यावसायिक दृष्टिकोन आणि समृद्ध कल्पनाशीलता तसेच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करण्याचे सामथ्र्य आदी पात्रता असायला हव्यात.
आय.टी./परिचालनात्मक इंटर्नशिप- मायक्रोसॉफ्टचा आय.टी. किंवा परिचालनात्मक विभाग म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅप्लिकेशन्स व नवी उत्पादने हाताळायची संधी मिळणारा पहिला ग्राहकच असतो, ज्याच्या संपूर्ण समाधान व संमतीनंतरच ही उत्पादने बाजारात रवाना केली जातील. या विभागात काम करणाऱ्या इंटर्न्‍सना अर्थात आपल्या ध्यासवृत्ती व समर्पणातून कंपनीसाठी अर्थपूर्ण योगदान मिळणे अपेक्षित असते. या इंटर्नशिपमध्ये प्रदान केल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये आयटी प्रोग्राम मॅनेजर, आयटी अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर, आयटी सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीयर, सिस्टीम अ‍ॅनालिस्ट, बिझनेस अ‍ॅनालिस्ट वगैरेंचा समावेश होतो. अर्जदारांकडे कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस, अकाऊंटिंग, फायनान्स किंवा तत्सम विषयातील बीए/बीएस पदवी असणे ही मुख्य पात्रता मानली जाईल.
मार्केटिंग इंटर्नशिप- मार्केटिंग इंटर्न्‍सची संख्या थोडकी व परिणामी दुर्मिळच असते. मायक्रोसॉफ्टमधील मार्केटिंग मॅनेजर इंटर्न्‍सना थेट कॅम्पेन्सवर काम करण्याची संधी मिळते. असोसिएट प्रॉडक्ट मॅनेजर, टेक्निकल प्रॉडक्ट मॅनेजर, एमएसएन क्लायन्ट सव्‍‌र्हिसेस अशा जबाबदाऱ्यांवरही त्यांना काम करायची संधी मिळते. बाजारपेठेचे विश्लेषण, स्पर्धाशीलता आणि ग्राहकांच्या गरजा यांचे नेमके आकलन त्यांनी मांडणे अपेक्षित असते आणि या आकलनानुरूप नेमके धोरण काय असावे, हेही त्याने स्पष्ट करायला हवे. कामाच्या स्वरूपानुसार अर्थशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग किंवा अन्य संबंधित विषयातील बीए, बीएस, बीबीए किंवा एमएस अशी शैक्षणिक पात्रता, मौखिक तसेच लेखी संवाद कौशल्य आणि सशक्त विश्लेषणात्मक व सृजनात्मक कौशल्य अशा पात्रता अर्जदाराकडे असायला हव्यात.
अन्य सेवा इंटर्नशिप- यात असोसिएट कन्सल्टंट, टेक्निकल अकाऊंट मॅनेजर, असोसिएट सर्च अकाऊंट मॅनेजर, कस्टमर सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड सपोर्ट अशा जबाबदाऱ्यांवर इंटर्न्‍सना काम करावे लागते. सप्लाय चेन मॅनेजरला यांना थेट ग्राहकांशी संधान बांधून त्यांच्यासाठी सोयीचे असलेले, प्रभावी वितरणविषयक धोरण आखावे लागेल.
इच्छुक अर्जदारांना मायक्रोसॉफ्टमधील विविध प्रकारच्या इंटर्नशिपसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येईल, पण त्यासाठी ते वापरत असलेल्या विंडोज् कार्यप्रणालीचे जिवंत प्रमाण (लाइव्ह आयडी) तसेच एमएसएन हॉटमेल, एमएसएन मॅनेजर किंवा पासपोर्ट अकाऊंटही असायला हवे.
ऑनलाइन अर्जासाठी http://www.microsoft.com/college/ip_overview.mspx वर जाता येईल.
चंद्रगुप्त अमृतकर
ग्लोबल फीचर्स/ globalfeatures@lycos.com