Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच निसर्गाने भारताला भरभरून दिले आहे. भारताला ७५०० कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे भारतात र्मचट नेव्हीचे महत्त्व वाढले आहे. भारताच्या संरक्षण सेवेशी इंडियन नेव्ही संबंधित आहे. तर दुसरा पैलू हा र्मचट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदलाचा आहे.
जगभर मालाची ने-आण करणे हा व्यापारी नौदलाचा मुख्य कार्यभाग आहे. मर्चन्ट नेव्हीमध्ये काही जहाजे तेलाच्या वाहतुकीचेही काम पाहतात, तर काही प्रवासी जहाजाने संपूर्ण जग फिरतात किंवा आपल्या व्यापारासाठी संपूर्ण जगप्रवास करतात. अशी ही मालवाहतूक, तेलवाहतूक, प्रवासी वाहतूक सागरी मार्गाने म्हणजेच र्मचट नेव्हीच्या सहाय्याने होत असते. खुल्या व्यापारी धोरणामुळे संपूर्ण जग जवळ आले. आपल्याला पूर्वीपासून सागरी वाहतुकीचे महत्त्व लक्षात आले आहे. याचेच उदा. सागरी वाहतुकीनेच
 

कोलंबसला अमेरिकेचा शोध लागला. वास्को-द-गामा भारतात पोहोचला आणि जगातील आधुनिक वस्तू घराघरात पोहोचल्या, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे र्मचट नेव्हीचे महत्त्व वाढले आहे.
भारतात असलेली प्रचंड लोकसंख्या, किनाऱ्यालगत असलेली मोठमोठी शहरे यामुळे प्रचंड विस्तार आणि मिळालेला मोठा सागरी किनारा यामुळे भारतात र्मचट नेव्हीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी प्रचंड स्वरूपात उपलब्ध आहेत. कारण एका जहाजावर जवळजवळ १४०० कर्मचारी काम करत असतात. एक छोटेसे गावच वसलेले असते. र्मचट नेव्हीचे आकर्षण आज सर्वच तरुणाच्या मनात निर्माण झाले आहे. कारण-
१) आर्थिक स्थैर्य आणि अगदी चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीदेखील २०-२५ हजार इतका पगार घेतो.
२) संपूर्ण जग फिरायला मिळते. आणि ही नोकरी करारतत्त्वावर असते. साधारणपणे जहाज कंपनी सहा ते नऊ महिन्याच्या करारतत्त्वावर उमेदवाराची नेमणूक करते. बाकी वेळ कर्मचारी कुटुंबासमवेत व्यतीत करू शकतो.
र्मचट नेव्हीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे जगभर प्रवास करायचा असतो. त्यासाठी सहा महिने सलग आपण बोटीवर व घरापासून दूर असतो. त्यामुळे सहा महिने आपल्या कुटुंबापासून आपण लांब राहतो व त्यांना भेटू शकत नाही हा र्मचट नेव्हीचा तोटा आहे. या क्षेत्रात सर्वानाच खूप मोठी संधी आहे. या क्षेत्रात ओपन, एस्सी असा काही भेदभाव नाही. जो मनुष्य चांगले काम करील, मेहनत घेईल तो पुढे जाईल. त्यामुळे र्मचट नेव्हीमध्ये मेहनतीला पर्याय नाही. साहसी वृत्तीची, आव्हान पेलण्याची वृत्ती असणारी, कणखर, ताकदवान अशी मुले र्मचट नेव्हीमध्ये खूप चांगली ठरतात.
मुंबई हे व्यापारी बंदर आहे. शिवाय भारतातील सर्वात मोठे बंदर मुंबई आहे. त्यामुळे या बंदरांतून रोज हजारो टनाच्या मालाची ने-आण होत असते. आज समुद्रमार्गे प्रवास करण्याची संख्याही वाढली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी दुसरा क्रमांक लागतो. तर जगात भारताचा दहावा क्रमांक लगतो.
जगातील सर्व राष्ट्रांनी केलेल्या गॅट करारानुसार WTO- वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापन झाली. या संस्थेचे भारताने सभासदत्व पत्करले आहे. त्यामुळे भारतीयांचे आयात व निर्यातीची क्षेत्रे अधिक विस्तारली आहेत.
र्मचट नेव्हीत जायचे कसे?
जहाजावर वेगवेगळ्या विभागांत कर्मचारी भरती होत असते. र्मचट नेव्हीमध्ये पुढील विभागांमध्ये कर्मचारी भरती केली जाते.
१) डेक विभाग, २) इंजिन विभाग, ३) सव्‍‌र्हिस विभाग.
र्मचट नेव्हीसाठी तांत्रिक व अतांत्रिक असे दोन्ही प्रकारचे उमेदवार लागतात. अगदी आठवीपासून पदवीपर्यंतच्या सर्वाना मोठी संधी आहे. विशेषत: आय.टी.आय. किंवा बारावी सायन्स किंवा बी. एस्सी. वा बी. ई. इंजिनीअरिंग झालेली मुले असतील अशा मुलांना र्मचट नेव्हीमध्ये खूप मोठी संधी आहे. याशिवाय ज्यांची प्रकृती धडधाकट आहे, ज्यांना हिंदी, इंग्रजीचे उत्तम ज्ञान आहे, अशी मुले हेल्पर्स, शिपाई, वेटर्स, तांडेल, इ. पदावर नियुक्त केले जातात.
र्मचट नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराची मानसिक व वैद्यकीय चाचणी अत्यंत महत्त्वाची असते. या चाचणीत उत्तीर्ण झाल्याशिवाय र्मचट नेव्हीत भरती करून घेतले जात नाही. र्मचट नेव्हीमध्ये करिअरसाठी इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर पासपोर्ट-व्हिसा काढून ठेवावा. आपली शरीर प्रकृती निरोगी असून चालत नाही तर ती सागरी हवामानास टक्कर देणारी असावी. र्मचट नेव्हीमध्ये उमेदवाराची पडेल ते काम करण्याची तयारी असावी.
र्मचट नेव्हीमध्ये रिक्रुटमेंटसाठी खूप संस्था कार्यरत आहेत. र्मचट नेव्हीमध्ये जे कोणी लोक काम करतात. त्यांच्याकडून विविध माहिती घेऊन भरती कशी होते, कोठे होते, याची माहिती काढा. र्मचट नेव्हीबाबत मार्गदर्श्रन करणारे अनेक मार्गदर्शक आता खूप ठिकाणी उपलब्ध आहेत. पेपर्समध्ये जाहिरत येते त्यावर लक्ष ठेवा. जहाज कंपन्यांनी आपल्या वेबसाइटस् काढल्या आहेत, त्यांना भेटी द्या म्हणजे नेव्हीमध्ये रिक्रुटमेंटबाबत खूप मार्ग उपलब्ध आहेत. फक्त आपण आपले करिअर र्मचट नेव्हीत करायचे ठरविले तर शिस्तबद्धता पहिल्यापासून अंगी बाळगा व त्या तऱ्हेने पावले उचला म्हणजे तुमचे यश निश्चित.
डेक विभागातील जो चीफ असतो त्याला ‘चीफ’ किंवा ‘कॅप्टन’ असे म्हणतात. त्याच्या जोडीला डेक ऑफिसर्स असतात. याशिवाय कॅप्टनच्या मदतीला हार्बर मास्टर पायलट ऑफ शिप, सारंग आणि चतुर्थ श्रेणीतील हेल्पर्स, कारपेंटर्स व इतर कर्मचारी या विभागात मोठय़ा प्रमाणात असतात. कॅप्टन हा जहाजाचा प्रमुख असतो. कॅप्टनचे संपूर्ण जहाजावर आणि अधिकारीवर्गावर पूर्ण लक्ष असते व सर्वाशी विचारविनिमयाने, मदतीने जहाजाचा मार्ग सुकर कसा होईल, हे तो पाहतो. जहाजाचे आगमन-निर्गमनाचे वेळापत्रक कॅप्टन आणि त्याचे सहकारी करीत असतात. तसेच जहाज कंपनीच्या कार्यालयाच्या सतत संपर्कात राहणे, डेकवरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कामे कॅप्टन व इतर सहकारी बघतात.
सेकंड मेट- सेकंड मेट हा फर्स्ट मेट व कॅप्टनला सहाय्यक असतो. खास करून रात्रीच्या वेळेस जेव्हा जहाजावरून मालाची चढ-उतार केली जाते तेव्हा स्वत: जातीने उभा राहून लक्ष ठेवणे हे त्याचे महत्त्वाचे काम असते आणि अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे जहाजावरील यंत्रसामुग्रींच्या देखभालींवर लक्ष ठेवणे हे होय.
थर्ड मेट- थर्ड मेट हे कॅप्टन आणि सेकंड मेट यांच्या सूचनांचे पालन करत असतात. कॅप्टनच्या सूचना इंजिनरूमपर्यंत पोहोचविणे आणि कॅप्टनच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करून घेणे अशा प्रकारची कामे थर्ड मेटला करावी लागतात.
डेक विभागात आणखी बऱ्याच प्रकारचा कर्मचरीवर्ग असतो. या कर्मचारीवर्गात हार्बर मास्टर, पायलट ऑफ शिप, सारंग इत्यादी महत्त्वाची पदे असतात नंतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीवर्ग असतो. जहजात काम करण्यासाठी प्रथम जहाजात जाणे महत्त्वाचे आहे. प्रथम साध्या कर्मचाऱ्यापासून तर दरवर्षी परीक्षा असतात. जर या परीक्षा उत्तीर्ण झाल्या तर एक साधा कर्मचारीही अगदी कॅप्टन लेव्हलपर्यंत पोहोचू शकतो.
इंजिन विभागातील ऑफिसर्स- जहाजाच्या इंजिन विभागात शिप इंजिनीअर, इलेक्ट्रिकल ऑफिसर, कम्युनिकेशन-सॅटेलाईट इनचार्ज, सीकानो इत्यादी महत्त्वाची पदे आहेत.
ज्याप्रमाणे सर्व डेक विभागाचा प्रमुख ‘कॅप्टन’ असतो, त्याचप्रमाणे इंजिन विभागात ‘शिप इंजिनीयर’ हा चीफ असतो. जहाजावरील सर्व प्रकारची इंजिन व्यवस्थित कार्य करीत आहेत/नाहीत हे पाहणे हे शिप इंजिनीअरचे प्रमुख काम असते तसेच जहाजावरील अन्य साधने उदा. बॉयलर्स, इलेक्ट्रिक साधने, रेफ्रिजेटिंग्ज व डेकवरील इत्यादी साधने यावर त्यांचे लक्ष असते. इलेक्ट्रिक ऑफिसर व सॅटेलाईट कम्युनिकेशन इनचार्ज यांचीही कामे महत्त्वाची आहेत. सिकोनी हा जहाजावरील इतर कामे करतो. जहाजावरील आपल्या देशाचा झेंडा फडकवत ठेवणे अशा प्रकारची महत्त्वाची कामे सिकोनीचीच आहेत.
इंजिन विभागात इंजिनीअर्सना सहाय्य करणारी अशी इंजिनीअर्सची अनेक पदे असतात. तसेच सॅटेलाईट कम्युनिकेशन इनचार्ज यांना सहाय्य करणारीही अनेक पदे असतात. अशा पदांसाठी डिप्लोमाधारकही चालतात, शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षणधारकही इंजिन विभागात काम करू शकतात.
३) सव्‍‌र्हिस डिपार्टमेंटमधील मनुष्यबळ- जहाजावरील हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. काही कुटुंबे जहाजातून दीर्घ प्रवासाला निघालेली असतात अशा कुटुंबांना परकेपणा वाटू नये म्हणून जहाजावरील कर्मचारी खूप जिव्हाळ्याने त्यांच्याशी वागतात, त्यांच्या निवासाची, भोजनाची, वैद्यकीय सेवेची, करमणुकीची अशा प्रकारच्या सोयींची उपलब्धता करून देणे तसेच कठीण प्रसंगी अशा कुटुंबांना धीर देणे अशा प्रकारची कामे सव्‍‌र्हिस डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांना करावी लागतात.
सव्‍‌र्हिस विभागाचा प्रमुख ‘स्टीवर्ड’ हा असतो. त्याच्या हाताखाली स्वयंपाक (शेफ), सेकंड कूक, थर्ड कूक, पॅन्टीमॅन, जनरल वेटर, ज्युनियर हॅण्ड युटिलिटी हॅण्ड, लॉन्ड्रीमॅन पदे असतात.
आता आपल्या लक्षात आले असेल की, र्मचट नेव्हीमध्ये किती प्रकारची पदे उपलब्ध आहेत आणि यामध्ये तुम्ही किती चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
र्मचट नेव्हीमध्ये उमेदवारांची भरती
१) उमेदवाराने प्रथम ज्या क्षेत्रात जावयाचे आहे त्याची निवड करून त्याप्रमाणे मार्गक्रमणा करावी.
२) जहाजावर काम करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी/ १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) उमेदवाराची शरीर प्रकृती निरोगी व सुदृढ असावी. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची शारीरिक व मानसिक क्षमता असावी.
४) या क्षेत्रात करिअर करताना- पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी.
५) महत्त्वाचे म्हणजे जीवनाविषयीचे विचार सकारात्मक हवेत.
६) उमेदवाराची मानसिक व शारीरिक चाचणी महत्त्वाची असते. या चाचणीत उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणत्याही उमेदवारास र्मचट नेव्हीत प्रवेश मिळत नाही.
७) उमेदवाराला इंग्रजी भाषेचे ज्ञान हवे; एखादी वेगळी भाषा येत असेल तर खूपच चांगले.
८) र्मचट नेव्हीमध्ये महिलांची भरती केली जाते. आज खूप युरोपियन कंपन्यांमध्ये अनेक महिला जहाजाच्या कॅप्टन आहेत. तसेच इंजिन विभागामध्येही काम करतात.
ज्यांना मनोमन र्मचट नेव्हीमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची इच्छा असेल तो उमेदवार नक्कीच पुढे जाईल.
भारतातील व्यापारी जहाजाचा कारभार हा मुंबई, न्हावाशेवा, कोचीन, कांडला, मद्रास, न्यू मँगलोर, मार्मा गोवा, पारादीप, तुतिकोरीन, विशाखापट्टणम् या बंदरांतून चालतो.
र्मचट नेव्हीमध्ये कार्यरत कंपन्या
१) शिपिंग कॉर्पोरेशनऑफ इंडिया २) ग्रेट इस्टर्न शिपिंग ३) इंडियन स्टीमशिप कंपनी ४) कामोदर बल्क कॅरिअर्स ५) साऊथ इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन ६) चौगुले स्टीमशिप लिमिटेड ७) डेंपो स्टीमशिप लिमिटेड ८) रतूआवन शिपिंग भरती.
वरदा मुळे-जोशी
फोन: ९४२१४७३१३१.