Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

हे जग किती जवळ आले आहे. अगदी काही सेकंदांत सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशी संवाद साधता येतो. अशा प्रकारे की ती व्यक्ती आपल्या शेजारीच बसलेली आहे. याचे कारण म्हणजे दूरध्वनी क्षेत्रातील क्रांती. या शतकातील जवळपास सर्वच लोकांना याचे नावीन्यदेखील राहिलेले नाही.
अमेरिकेतील, इंग्लंडमधील, कॅनडातील, सातासमुद्रापलीकडील कोणाशीही काही सेकंदांत संपर्क साधता येतो. आणि या टेलिकम्युनिकेशनचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड क्रांती घडून आली आहे. यात सरकारी तसेच खासगी कंपन्यांचेही योगदान आहे. सरकारी- खासगी असे म्हणण्याऐवजी खरे योगदान आहे ते यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे. भारत सरकारचा उपक्रम असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नुकतेच ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
इंजिनीअरिंग अथवा टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करता येईल. टेलिकम्युनिकेशन/
 

इलेक्ट्रॉनिक्स/ रेडिओ/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अथवा पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षांस असणाऱ्या उमेदवारांनाही या परीक्षेसाठी अर्ज करता येईल.
परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी
ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम), ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (सिव्हिल), ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी २१ जून २००९ रोजी परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची आहे. परीक्षा १२० गुणांची असून त्यासाठी तीन तासांचा म्हणजे १८० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम) या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत तीन घटक असून पहिले दोन घटक इंजिनीअरिंग विषयाशी निगडित असून त्यासाठी प्रत्येकी ५० गुण ठेवण्यात आलेले आहेत तर तिसरा घटक हा जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट असून त्यासाठी २० गुण ठेवण्यात आलेले आहेत तर ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत पहिले दोन घटक हे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयाशी निगडित असून त्यासाठी प्रत्येकी ५० गुण ठेवण्यात आलेले आहेत. तिसरा घटक हा जनरल अवेअरनेस असून त्यासाठी २० गुण ठेवण्यात आलेले आहेत. ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (सिव्हिल) या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत पहिले दोन घटक हे सिव्हिल इंजिनीअरिंग विषयाशी निगडित असून त्यासाठी प्रत्येकी ५० गुण ठेवण्यात आलेले आहेत. तिसरा घटक हा जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट असून त्यासाठी २० गुण ठेवण्यात आले आहेत.
ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम) या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्या विभागात मटेरियल्स अ‍ॅण्ड कंपोनंटस्, फिजिकल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉन डिवायसेस, नेटवर्क थिअरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स
असे घटक आहेत तर दुसऱ्या विभागात अ‍ॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स सर्किटस्, डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किटस्, कंट्रोल सिस्टिम, कम्युनिकेशन सिस्टिम, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, मायक्रोप्रोसेसर असे घटक आहेत. तिसऱ्या घटकात इंग्रजी या विषयातील व्याकरणावर तसेच उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर चालू घडामोडींवर आधारित प्रश्न या घटकात विचारले जातात.
ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (इलेक्ट्रिकल) या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्या विभागात
ईम थिअरी, इलेक्ट्रिकल मटेरिअल्स, इलेक्ट्रिकल सर्किटस्, मेजरमेंट अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, कंट्रोल सिस्टिम असे घटक आहेत तर दुसऱ्या विभागात इलेक्ट्रिकल मशीन्स अ‍ॅण्ड पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर सिस्टिम, अ‍ॅनालॉग अ‍ॅण्ड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड सर्किटस्, मायक्रोप्रोसेसर, कम्युनिकेशन सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असे घटक आहेत तर तिसऱ्या विभागात इंग्रजी या विषयाच्या व्याकरणावर आधारित तसेच उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. याशिवाय चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश यात करण्यात येतो.
ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (सिव्हिल) या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्या विभागात बिल्डिंग मटेरियल, सॉलिड मेकॅनिक्स, स्ट्रक्चरल अ‍ॅनॅलिसिस, डिझाईन
ऑफ स्टील स्ट्रक्चर्स, डिझाईन ऑफ काँक्रीट स्ट्रक्चर्स, कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस, प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या घटकांचा समावेश होतो तर दुसऱ्या विभागात ओपन चॅनेल,
पाईप फ्लो, हाईड्रॉलिक मशीन्स अ‍ॅण्ड हाइड्रोपॉवर, हाइड्रोलॉजी, वॉटर रिसोर्स इंजिनीअरिंग, वॉटर सप्लाय इंजिनीअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनीअरिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, एअर अ‍ॅण्ड नॉईज पोल्युशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी, सॉईल मेकॅनिक्स, फाऊंडेशन इंजिनीअरिंग,
सव्‍‌र्हेइंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग अशा घटकांचा यात समावेश होतो तर जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट या विभागात चालू घडामोडींवर आधारित प्रश्न तसेच इंग्रजी व्याकरणावर व उताऱ्यावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात येतो.
अशा प्रकारच्या या परीक्षेचा अभ्यासक्रम असून आपण पूर्ण केलेल्या पदवी अभ्यासक्रमाशी निगडित कामाची
संधी येथे येऊन पोहोचली आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात तसेच आपण शिक्षण घेतलेल्या अभ्यासक्रमाचा योग्य पद्धतीने नोकरीत अवलंब करता येईल. म्हणूनच
जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या संधीचा लाभ
उठवून अभ्यासास सुरुवात करावी. टेलिकम्युनिकेशनचे तंत्र वाढत असून टेलिफोन व मोबाईलचे जाळे जगभर पसरले आहे आणि ते वाढत चालले आहे. भारत संचार निगम लिमिटेड ही भारतातील टेलिकम्युनिकेशनची
सर्वात मोठी कंपनी असून या सर्वात मोठय़ा
कंपनीत अधिकारी म्हणून काम करण्याची संधी
यापेक्षा वेगळी कशी असू शकते? योग्य पद्धतीने तंत्रपूर्ण अभ्यास केल्यास नक्कीच या परीक्षेत चांगले यश
मिळवू शकता. परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन केल्यास या सर्वात मोठय़ा भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशनमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
प्रा. संजय मोरे
फोन: ९३२२३५०४६६
(लेखक हे मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभागात गणिताचे अध्यापन करतात.)