Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या ५ मालमोटारींना ७० हजार दंड
मर्यादेपेक्षा जास्त वाळूवाहतूक
श्रीगोंदे, १८ मार्च/वार्ताहर

बीड जिल्ह्य़ातून पुण्याकडे मर्यादेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणाऱ्या ५ मालमोटारी पोलिसांनी

 

पकडल्या. न्यायालयाने या मालमोटारचालकांना प्रत्येकी १४ हजार रुपये दंड ठोठावला. तालुक्यातील वाळू वाहतुकीवर पोलीस करडी नजर ठेवणार असल्याचे निरीक्षक महादेव चव्हाण यांनी सांगितले.
कर्जत व श्रीगोंदे महसूल यंत्रणांची नजर चुकवून बीड जिल्ह्य़ातील खडकत येथून दररोज पुण्याकडे वाळू घेऊन मालमोटारी जातात. अशाच अतिरिक्त वाळू घेऊन जाणाऱ्या ५ मालमोटारी चव्हाण, फौजदार अनिल जाधव, पोलीस कर्मचारी एम. एल. सुरोशे, बी. जी. फरांदे, सी. एच. दहिफळे, बी. ई. गव्हाणे व देवानंद सोनवणे यांच्या पथकाने पकडल्या. गाडय़ा लोणावळा येथील असून, त्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे (कंसात आरोपी चालक) मालमोटार क्रमांक एमएच १४ बीटी १०८४ (विनोदकुमार नेवालाल वर्मा), एमएच १४ बीजे ६९०९ (संजय महेश राऊत), एमएच १४ जेएस ८०३२ (सोपान ज्ञानदेव घालमे), एमएच १४ बीजे ७०८० (चांगदेव मोतीराम कुसळकर), एमएच १४ एएस ९७६५ (शंकर गजेंद्र पवार).
या मालमोटारचालकांना न्यायाधीश विवेक गव्हाणे व आर. आर. पोंदकुले यांच्यासमोर हजर केले असता, आरोपींना प्रत्येकी १४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यापुढे तालुक्यातून होणारी वाळूचोरी पकडण्यासाठी ५ पोलिसांचे गस्तीपथक तयार करण्यात येणार आहे. पथक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
तीन अट्टल गुन्हेगारही जेरबंद निरीक्षक चव्हाण व फौजदार जाधव यांनी येळपणे येथील जबरी चोऱ्या, खंडणी, मारामाऱ्या अशा गुन्ह्य़ांमध्ये फरार आरोपी अनिल पवार, त्याचा भाऊ भाऊसाहेब व सहकारी सुरेश नितनवरे यांना आज जेरबंद केले. एका फिर्यादीला धमकाविण्यासाठी हे तिघे येळपणे येथे जमले होते. ठरल्याप्रमाणे फौजदार जाधव यांनी चव्हाण यांना ‘वाळूच्या ३ मालमोटारी उभ्या आहेत’, असा संदेश पाठविला. त्यावरून पोलीस पथकाने छापा टाकून या गुन्हेगारांना पकडले.