Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी रामेश्वर चोपडे‘सदिच्छा’चे पालवे अध्यक्ष
नेवासे, १८ मार्च/वार्ताहर

राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर चोपडे यांची, तर सदिच्छा मंडळाच्या

 

अध्यक्षपदी राजाभाऊ पालवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेचे त्रवार्षिक अधिवेशन विष्णूदादा खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. जिल्हा संघाचे अध्यक्ष सुभाष खोबरे, कार्याध्यक्ष संजय शेळके, सरचिटणीस रमेश घुले, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब रोहकले, शिक्षक नेते द. मा. ठुबे, भाऊसाहेब डेरे, राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे या वेळी उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष उद्धव मरकड यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. तालुक्यातील सर्व केंद्राच्या वतीने मरकड, तालुका संघाचे सरचिटणीस अरविंद घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका शिक्षक संघाची कार्यकारिणी - कार्याध्यक्ष अशोक पंडित, सरचिटणीस किसन शेटे, कार्यालयीन चिटणीस संतोष निमसे, उपाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे, पुरुषोत्तम आंधळे, संतोष दरवडे, बाबमियाँ पठाण, जगन्नाथ वामन, कोषाध्यक्ष श्याम फंड, सहचिटणीस ज्ञानेश्वर जाधव, शिरीष पाटोळे, प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, शेषराव सावंत, ऑडीटर भास्कर खरे, जिल्हा प्रतिनिधी उद्धव मरकड, विजय करवंदे, राजेंद्र इंगळे, रवींद्र कडू, गोकुळ झावरे, सल्लागार संजय शेळके, कल्याण शिंदे, मोहन पागिरे.
सदिच्छा मंडळ नेवासे तालुका कार्यकारिणी - कार्याध्यक्ष राजाराम पाटील, सरचिटणीस रामचंद्र गजभार, कार्यालय चिटणीस रेवणनाथ पवार, उपाध्यक्ष राजेंद्र खैरे, भाऊसाहेब दहातोंडे, कल्याण नेहूल, कोषाध्यक्ष हनुमान चौधरी, सहचिटणीस संजय आगरकर, बाळासाहेब क्षीरसागर, ऑडीटर कृष्णा तपोणे, श्रीराज रंगरेज, आदिनाथ नरवडे, जिल्हा प्रतिनिधी ब. य. म्हस्के, संजय खरे, नंदकुमार पाथरकर, सल्लागार कल्याण शिंदे, नामदेव दहातोंडे, राधाकृष्ण वाघमारे, भास्करराव कराळे.